Gautami patil  Saam tv
मुंबई/पुणे

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Gautami Patil Dance video : मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी आयोजन पाहायला मिळत आहे. यंदाही गौतमी पाटीलचा डान्स गोविंदांसाठी आकर्षण ठरत आहे.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुसळधार पावसातही मुंबई-ठाण्यात दहीहंडीच्या भव्य आयोजनात गोविंदा पथकांचा सहभाग पाहायला मिळत आहे. दहीहंडीच्या उत्साहात गौतमी पाटीलचा जलवा पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या डान्सपुढे मुंबईकर फिदा झाले आहेत.

गौतमी पाटील या वर्षी देखील गौतमी पाटील मुंबईत आली आहे. मुंबईतील ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा जलवा पाहायला मिळणार आहे. गौतमी पाटील यंदा कोळी समाजाच्या पोशाखात आली आहे. गौतमीने गळ्यात माशांचा नेकलेस घातला आहे. गौतमी अनेक कोळी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे.

गौतमी पाटील म्हणाली,'तुम्ही बघत आहात की, आम्ही खूप बदल केला आहे. आज सगळं वेगळं पाहायला मिळेल. मी दरवर्षी दहीहंडीला मुंबईला असते. मला मुंबईकर भरभरून प्रेम देतात. त्यामुळे कोळी पद्धतीने पोशाख केला. तसेच कार्यक्रमाला कोळी गाणी घेतली. त्यामुळे मी तेच केलं. दागिने देखील त्याच पद्धतीने घातले आहेत.

'मला कोळी लोक खूप आवडतात. ते भरभरून प्रेम देतात. त्यामुळे आवर्जुन कोळी गाणी घेतली आहेत. कोळी लोक लव्ह यू,असं गौतमी पाटील म्हणाली.

गौतमी पाटीलसहित मनोरंजन सृष्टीतील इतर अभिनेत्री आणि अभिनेते त्यांच्या डान्सचा जलवा गोविंदा पथकांसमोर सादर करताना दिसत आहे. अभिनेत्रींचं नृत्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी स्टेजसमोर दिसत आहे.

उत्साहाला गालबोट

मुंबईत एकीकडे दहीहंडी उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे दुर्देवी घटना घडली आहे. मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा थरावरून कोसळून मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ३० गोविंदा जखमी झाल्याची माहिती विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांकडून मिळाली आहे. त्यापैकी १५ जणांवर उपचार सुरू आहेत. तर १५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सायन रुग्णालयात १८, केईएममध्ये ६ तर नायरमध्ये ६ गोंविदा दाखल झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT