Gautami Patil News Saam TV
मुंबई/पुणे

Gautami Patil News: गौतमीच्या अडचणी वाढणार? पनवेलमधील कार्यक्रमानंतर आयोजकांवर गुन्हा दाखल

Ruchika Jadhav

Panvel News:

सबसे कातील म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत गौतमीचा एक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पनवेलमधील एका गावात तिचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

कारण काय?

पनवेलमधील वावंजे गावात असणाऱ्या सहारा रिसॉर्टमध्ये अंकित वर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाची कोणतीही पोलीस परवानगी न घेता विना परवाना आयोजकांनी सदर कार्यक्रम घेतला.

त्यामुळे पोलिसांनी आता आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय. विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर करत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजक रमाकांत चौरमेकर, अंकित वर्मा आणि सहारा रिसॉर्टचे मालक तसेच व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

गैतमीच्या कार्यक्रमात साप

गेल्याच आठवड्यात नवी मुंबईत गौतमीचा कार्यक्रम पार पडला. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई पार दिवानी होते. आता गौतमीची झलक पाहण्यासाठी चक्क एक साप देखील कार्यक्रमात पोहचला. कार्यक्रमात साप सापडल्याने नागरिकांची एकच धांदळ उडाली होती. सर्वजण पळापळ करू लागले. काही वेळाने सर्पमित्रांनी सापाला पकडले आणि निसर्ग अधिवासात सोडले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT