Gautami Patil Dance In Pune Saamtv
मुंबई/पुणे

Gautami Patil Dance Video: कातिल गौतमी पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात उतरली, 'बैलगाडा' गाण्यावर जोरदार थिरकली; VIDEO तुफान व्हायरल!

Gautami Patil Dance In Pune: नेहमी वाढदिवस, रिसेप्शन पार्ट्या अन् उत्सवांमध्ये थिरकणारी गौतमी पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात डान्स करत असल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यात नुकताच हा कार्यक्रम पार पडला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Gangappa Pujari

रोहिदास गाडगे, पुणे|ता. १६ जानेवारी २०२४

Gautami Patil Dance Video:

आपल्या तडफदार लावणीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना होणारी तुफान गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असतो. गावागावात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांची आणि डान्सची चर्चा पाहायला मिळते. नेहमी वाढदिवस, रिसेप्शन पार्ट्या अन् उत्सवांमध्ये थिरकणारी गौतमी पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात डान्स करत असल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यात नुकताच हा कार्यक्रम पार पडला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर होत आहे.

सबसे कातील गौतमी पाटील... गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कातिल अदा अन् डान्स आत्तापर्यंत राजकीय व्यासपीठावर, यात्रा, उत्सवांमध्ये अन् पार्ट्यांमध्ये नेहमीच पाहिल्या असतील. मात्र गौतमी पाटील पहिल्यांदाच क्रिकेटच्या मैदानात थिरकल्याचे पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यात तिचा हा कार्यक्रम पार पडला.

पुणे जिल्ह्याच्या (Pune) शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे शिरूर प्रीमियर लिग किक्रेट सामन्यांच आयोजन करण्यात आलं होतं आणि या क्रिकेट प्रीमियर लीगच्या फायनल सामन्याच्या शेवटच्या दिवशी गौतमी पाटीलने व्यासपीठावर नृत्य केलं,यावेळी खेळाडूंसह प्रेक्षकांचा हि गौतमी पाटील च्या नृत्यांला चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गौतमीच्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर गौतमीने तुफान डान्स केला. गौतमीच्या या डान्सला तरुणांनीही टाळ्या अन् शिट्ट्यांचा पाऊस पाडत भरभरुन दाद दिली. थोडक्यात क्रिकेटच्या मैदानात घातलेल्या राड्यानंतर यापुढे खेळाच्या मैदानातही आता गौतमीशिवाय रंग येणार नाही, असेच चित्र जणू पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

SCROLL FOR NEXT