Gautami Patil Car Accident Case x
मुंबई/पुणे

Gautami Patil : पुण्यात कार अपघात घडला त्यावेळी गौतमी पाटील नेमकी कुठे होती? स्वतःच सांगितलं ठिकाण

Gautami Patil Car Accident Case : गौतमी पाटीलच्या कारने एका रिक्षाला धडक मारली होती. या अपघात प्रकरणावरुन गौतमीवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या घटनेवर तिने प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

  • पुण्यातील अपघात प्रकरणावर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया.

  • अपघाताच्या वेळी घटनास्थळी नसल्याचे गौतमीचे स्पष्टीकरण.

  • जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे केले आरोप.

Gautami Patil Car Accident : पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे गौतमी पाटीलच्या कारचा अपघात झाला होता. कारने एका रिक्षाला धडक मारली होती. या अपघात प्रकरणामुळे गौतमी पाटीलवर टीका होत आहे. अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये होती असा आरोप करण्यात आला. महाराष्ट्राचा बिहार करु नको असे म्हणत तिच्या नावाने निषेध करण्यात आला. पोलिसांनी क्लीन चीट देऊनही तिच्या अडचणीत वाढ होत असल्याचे म्हटले जात होते. या संपूर्ण परिस्थितीवर आता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमी पाटीलने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली. गौतमी पाटील म्हणाली, माझी काही चूक नसताना मला गुन्हेगार ठरवले जात आहे. माझा या घटनेची काही संबंध नाही पोलिसांनीही हे सांगितले आहे. 'त्या' कुटुंबाला मदत देण्यासाठी माझे भाऊ गेले होते पण त्यांनी मदत नाकारली. पोलिसांनी जेव्हा बोलवले तेव्हा त्यांना सहकार्य केले आहे आणि करणार. चंद्रकात दादांनी ते विधान केले त्यामुळे मला वाईट वाटले.

'पण सगळेच माझ्या बाबतीत बोलतात. सगळे मला वाईटच बोलतात, कोण चांगले बोलतात? मी नाचले तरी वाईट होते आणि नाही नाचले तरी वाईटच आहे. मी जर त्या वेळी तिथे असते तर नक्कीच मी हे वाढवून दिले नसते. आता जे काही कायदेशीर आहे त्यानुसार चालेल… माझ्या नावाची बदनामी करत आहे तर मी का जाऊ???' असे गौतमीने म्हटले.

'चालक कुठे गेला होता हे मला माहिती नाही. चालकाची चूक झाली हे मला मान्य आहे. त्यांनी त्यावेळी तिथे मदत करायला हवी होती. जेव्हा घटना घडली तेव्हा मी मुंबईत होते. घटना घडल्यानंतर चालकाशी माझे अजूनही बोलणे झाले नाही. माझ्याकडे जी माहिती होती ती सगळी मी पोलिसांना दिली आहे. नातेवाईकाकडून वेगवेगळ्या प्रकारे पैसे मागितले जात होते. कुणी १९ लाख २० लाख रुपये मागितले जात होते, असे माझे मानलेले भाऊ मला सांगत आहेत. मला जाणीवपूर्वक यात अडकवले जात आहे असे वाटत आहे. शो बंद पाडले तर माझ्या हातावर अनेक जण आहेत त्यांचे हाल होतील', असे वक्तव्य गौतमी पाटीलने केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT