Gautami Patil apologizes to Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Gautami Patil News : दादा मला माफ करा, गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची माफी; काय आहे प्रकरण?

अजितदादांच्या इशाऱ्यानंतर खुद्द गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देत दादांची हात जोडून माफी मागितली आहे.

Satish Daud

Gautami Patil apologizes to Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गौतमी पाटील या नावाची चर्चा आहे. गौतमीच्या डान्सने तरुणांना अक्षरश: वेड लावलं आहे. मात्र, चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना विरोध होत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा गौतमी पाटील हिला राष्ट्रवादीच्या मंचावर बोलावू नका, अशी तंबीच आपल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना दिली आहे. (Latest Marathi News)

तिला आपल्या मंचावर नृत्यासाठी कुणीही बोलावू नये, अशी ताकीदच अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना दिली. आता अजितदादांच्या इशाऱ्यानंतर खुद्द गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देत दादांची हात जोडून माफी मागितली आहे. माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा, असं गौतमीने म्हटलं आहे.

नुकतीच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाची अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पदाधिकाऱ्यांसह झालेल्या या बैठकीत सांस्कृतिक विभागाच्या ठाणे जिल्हाध्यक्ष मेघा घाडगे यांनी बैठकीत अश्लील कार्यक्रमांचा मुद्दा उपस्थित केला होता.

मागील काही महिन्यांपासून गौतमी पाटीलच्या अश्लील डान्सच्या कार्यक्रमाचं आपल्याच पक्षातील नेत्यांकडून आयोजन करण्यात येत असल्याची तक्रार मेघा घाडगे यांनी अजित पवारांकडे केली होती. यानंतर अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. गौतमी पाटील हिला राष्ट्रवादीच्या मंचावर बोलावू नका, अशी तंबीच आपल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या इशाऱ्यानंतर खुद्द गौतमी पाटीलने प्रतिक्रिया देत दादांची हात जोडून माफी मागितली आहे. 'याआधी माझ्याकडून काही चुका झाल्या. मात्र लोकांनी माझ्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर मी त्या सुधारल्या. तेव्हापासून माझ्या नृत्यावर आक्षेप घेतले जात नाहीत. तेव्हापासून मी अश्चील नृत्य तसेच वादग्रस्त हावभाव करत नाही. पण तरीही माझ्याकडून काही चुकलं असेल तर दादा मला माफ करा', असं गौतमीने म्हटलं आहे.

अजितदादा खूप मोठे आहेत. त्यांना मी काहीही बोलू शकत नाही. पण जेव्हा जेव्हा मी चुकले तेव्हा माफी मागितली. पण अजूनही काही लोक मला ट्रोल करतायेत. ते कोण लोक आहेत, हे मला माहिती नाही. माझ्यात सुधारणा होऊनही माझ्या वागण्याची कुणीच दखल का घेत नाही? माझ्या सुधारणावादी वागण्यावर कुणीच का बोलत नाही? असा सवालही गौतमीने विचारला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT