kalyan dombivali Saam
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli: कल्याण डोंबिवलीत गॅस पुरवठा खंडीत; कधी चालू होणार? बंद करण्यामागचं कारण काय?

Gas Supply Disrupted in Kalyan Dombivli : डोंबिवली एमआयडीसी परिसरात आज (२९ मे) दुपारी १ वाजल्यापासून महानगर गॅसचा पुरवठा अचानक बंद झाला आहे. महानगर गॅस कंपनीने एसएमएसच्या माध्यमातून नागरिकांना याची माहिती दिली.

Bhagyashree Kamble

कल्याण डोंबिवलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरात आज दुपारी १ वाजल्यापासून महानगर गॅसचा पुरवठा अचानक बंद झाला आहे. घरडा केमिकल कंपनीजवळ गॅस पाईपलाइन डॅमेज झाल्याने हा गॅस पुरवठा खंडीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती वापरकर्ते आणि व्यापारीवर्ग त्रस्त झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी परिसरात आज (२९ मे) दुपारी १ वाजल्यापासून महानगर गॅसचा पुरवठा अचानक बंद झाला आहे. घरडा केमिकल कंपनीजवळ गॅस पाईपलाइन डॅमेज झाल्याने हा पुरवठा खंडीत झाल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण तसेच डोंबिवलीमध्ये गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. दुपारी १ वाजल्यापासून खंडित करण्याच आल्याची माहिती महानगर गॅस कंपनीने एसएमएसच्या माध्यमातून नागरिकांना दिली.

त्यांनी नागरिकांना या तांत्रिक बिघाडाची माहिती दिली. साधारणतः 9 ते 10 तास दुरुस्तीचा कालावधी लागणार असल्याने, गॅस सेवा रात्री 11.30 वाजेपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अचानक गॅस सेवा बंद झाल्यामुळे अनेक घरांमध्ये जेवणाची तयारी खोळंबली असून, हॉटेल व फूड व्यवसायिकांनाही मोठा फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT