Mumbai Road Repairs Saam Tv
मुंबई/पुणे

Ganeshotsav 2023: गणेशोत्सवापूर्वीच मुंबईतील रस्ते होणार चकाचक, BMC चा जम्बो प्लान

Mumbai Road Repairs: रस्त्यांवरील खड्डे (potholes in mumbai road ) बुजवण्याची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावीत, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Priya More

Mumbai Ganesh Festival: गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला असून संबंधित कामांना महानगरपालिका प्रशासनाकडून वेग देण्यात आला आहे. श्रीगणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन सुरळीत व्हावे, यासाठी रस्त्यांवरील खड्डे (potholes in mumbai road ) बुजवण्याची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करावीत, खड्डे बुजवताना रस्त्यांचे समतलीकरण होईल याकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे, अशा सूचना अतिरिक्त महानगरपालिका (BMC) आयुक्त पी. वेलरासू यांनी सर्व विभाग कार्यालयांना तसेच मध्यवर्ती यंत्रणांना दिल्या आहेत.

मुंबईत १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाशी निगडित सर्व कामे योग्यरित्या आणि वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यानंतर आता अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी रस्ते सुस्थितीत राखण्याच्या दृष्टीने सर्व विभाग कार्यालयांसह रस्ते विभागाला लेखी निर्देश दिले आहेत.

पावसामुळे मुंबई महानगरातील रस्त्यांवर झालेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. असे असले तरी देखील गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, यासाठीची खातरजमा विभाग स्तरावर करण्याची करावी, रस्त्यावर खड्डे आढळल्यास मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधून खड्डे बुजवण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेण्यात यावे, असे निर्देश पी. वेलरासू यांनी दिले आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे. गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या परवानगीनुसार विभागीय सहायक आयुक्तांनी श्रीगणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनाचा नकाशा तयार करून आढावा घ्यावा, तसेच विभागीय सहायक आयुक्त यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय साधून खड्ड्यांबाबतच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी. गणेशोत्सवासाठी दिलेल्या परवानगीनुसार मंडप उभारणी केल्याने झालेले खड्डे बुजवावेत. असे रस्ते सुस्थितीत करण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांची असेल, असेही त्यांनी दिलेल्या या आदेशांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

तसंच, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मॅस्टिक अस्फाल्टचा वापर केला जात आहे. काही ठिकाणी खड्डे बुजवल्यानंतर उंचवटा तयार झालेला आढळल्यास मिलींग करून त्याचे समतलीकरण करावे. खड्डा बुजवल्यानंतर निर्माण झालेला उंचवटा समतलीकरणासाठी विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधावा. वाहतुकीदरम्यान अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठी खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT