Pune Saam Tv News
मुंबई/पुणे

Gaja Marne: आली रे आली....गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळल्या; केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या नीकटवर्तीयाला मारहाण भोवली

Gaja Marne Arrest: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गजानन मारणेला अटक करण्यात आली आहे. गजा मारणेला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यात आली होती. याच प्रकरणी गजा मारणे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. तसेच मुख्य आरोपी बाब्या पवारला देखील कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

टोळी प्रमुख ताब्यात

१९ फेब्रुवारीला आयटी अभियंत्याला मारहाण झाली होती. कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह त्याच्या टोळीविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. घटनास्थळी गजा मारणे जरी उपस्थित नसला तरी, तो टोळी प्रमुख म्हणून रडारवर होता. या प्रकरणी टोळी प्रमुख गजा मारणेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मकोका अंतर्गत गुन्हा

मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग मारहाण प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी मारणेच्या संपत्तीची चौकशी करणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच आरोपींयांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तीन आरोपींना अटक करण्यात आले असून, मुख्य आरोपी श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवारला देखील अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

गाडीचा धक्का लागल्यावरून मारहाण

देवेंद्र जोग हे आयटी अभियंता असून ते भाजपचे कार्यतकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. १९ फेब्रुवारीला घरी जात असताना रस्त्यावर गर्दी होती. त्यामुळे जोग रस्त्याच्या कडेला उभे होते. त्यावेळी गाडीचा धक्का लागला. धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी जोग यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात जोग यांना गंभीर दुखापत झाली. त्यांनी वडिलांसोबत जात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

नंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT