DN Nagar POlice Saam tV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : अंगावर शिंकल्याच्या रागातून मित्राचा चेहरा जाळला; अंधेरीतील धक्कादायक घटना

Mumbai Latest News : डीएन नगर पोलिसांनी सांगितलं की, 26 डिसेंबर रोजी झालेल्या वादातून ही संपूर्ण घटना घडली होती. मुलाला चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर हजर करण्यात आले आणि त्याचे समुपदेशन करण्यात आले.

सूरज सावंत

Mumbai News :

अंगावर शिंकल्याच्या रागातून १६ वर्षांच्या मुलाने मित्राचा चेहरा जाळल्याचा प्रकार अंधेरीत घडला आहे. जखमी मुलाला कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाविरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपी आणि पीडित दोघेही मित्र बुधवारी भेटले होते. त्यावेळी मोबाइलवर खेळत असताना पीडित मुलगा आरोपी मुलाच्या अंगावर शिंकला. यामुळे रागावलेल्या मित्राने मुलाच्या चेहऱ्यावर सॅनेटायजर फेकले व लायटरने त्याचा चेहरा जाळला. अंधेरीच्या गोल डोंगरी रोड येथे ही घडली आहे. (Mumbai News)

डीएन नगर पोलिसांनी सांगितले की, 26 डिसेंबर रोजी झालेल्या वादातून ही संपूर्ण घटना घडली होती. जेव्हा पीडित मुलगा त्याच्या मित्रासोबत मोबाईल फोनवर गेम खेळत होता. दरम्यान पीडित मुलगा मित्राच्या अंगावर शिंकला. त्यामुळे संतापलेल्या मित्राने त्याच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकले आणि लायटरने त्याचा चेहरा जाळला. पीडित मुलाच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला, कानाला आणि मानेला जखमा झाल्या आहे.

डीएन नगर पोलिसांनी सांगितलं की, मुलाला चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर हजर करण्यात आले आणि त्याचे समुपदेशन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT