Pune Freshers Party Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पुण्यात फ्रेशर पार्टींची क्रेझ, पबमध्ये अंडर २१ मुलांचा तुफान राडा; VIDEO व्हायरल

Pune Freshers Party: पुण्यामध्ये फेशर्स पार्टीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कॉलेजचे २१ वयोगटातील विद्यार्थी पबमध्ये जाऊन जोरदार पार्टी करत आहेत. या पार्टीमध्ये त्यांना दारू देखील दिली जात आहे. याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यामध्ये फेशर्स पार्टी वाढत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या राजाबहादूर मिल्स येथील किकी पबमध्ये नुकताच एका नामांकित कॉलेजमधील विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी झाली होती. या पार्टीचे व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर आता याच ठिकाणी पुन्हा फेशर्स पार्टी झाली. या पार्टीमध्ये तरुणांनी राडा केला. या पार्टीमध्ये सर्रास मद्यविक्री सुरू होती. या मुलांचे वय देखील २१ वर्षांच्या आतमध्ये आहे. या पार्टीचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात फ्रेशर पार्ट्यांची क्रेझ वाढत चालली असून दररोज पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. या पार्टींमध्ये सहभागी होणारे सर्व मुलं कॉलेजमध्ये शिकणारी आहेत. राजा बहारदूर मिलमधील 'डी मोरा' पबमध्ये फ्रेशर पार्टीत झाली. या पार्टीमध्ये अंडर २१ च्या मुलांनी तुफान राडा केला. बॉटलवर बॉटल उडवून या मुलांनी इन्जॉय केलं. अनेक पार्ट्या बेकायदा नियोजन करून केल्या जात आहेत.

गेल्या ८ दिवसांपासून पुण्यनगरीत फ्रेशर पार्टीचे आयोजन केले जाऊ लागले असून त्यामध्ये नामांकित महाविद्यालयाची मुलं जी २० वर्षांच्या आतील आहेत अशा मुलांना दारू दिली जाऊ लागली आहे. पुण्यातील वेगेवगेळ्या पब्स आणि पंचातारांकित हॉटेल्समध्ये या पार्ट्या सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी मनसेने राजा बहादूर मेील मधील किकी येथील एक पार्टीवर धाड टाकली आणि ही पार्टी बंद पाडली होती. या पार्टीमध्ये १७ ते २१ वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

त्यापूर्वी मुंढव्यातील पार्टीवरून स्थानिक नागरिक आणि मुलांमध्ये गोंधळ घातला होता. तत्पूर्वी पोलिसांनी या हॉटेल्ससाठी एक समिती नेमली आहे. त्यावर पोलिसांची, पालिकेची आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार असल्याचे सांगितले होते. तरीही अशा पार्ट्यांचे नियोजन होत असल्याचे दिसत आहे. या पार्ट्यांमुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT