Mumbai Train Accident Saam Tv News
मुंबई/पुणे

Ghatkopar Railway station : दुर्दैवी! मुंबईच्या घाटकोपरमध्ये लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू

Ghatkopar Railway station update : मध्य रेल्वेच्या स्टेशनवर प्रवासी प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्याची घटना घडली. ऐन गर्दीच्या वेळीत प्रवाशांसोबत गंभीर प्रकार घडला.

Vishal Gangurde

मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंब्रा ते दिवा दरम्यान धावत्या लोकलमधून पडून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्टेशनवर एक प्रवासी लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत प्रवासी अडकल्याची घटना घडली. घाटकोपरमधील या घटनेने मध्य रेल्वे विस्कळीत झाली. या प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी रेल्वे पोलीस तातडीने धावले. मात्र, दुर्दैवाने या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील सुरक्षित रेल्वे प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी लोकलच्या फुटबोर्डावरून प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर पडले होते. ट्रॅकवर पडलेल्या १२ प्रवाशांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला होता. मुंब्रा जवळील घटना ताजी असताना आता घाटकोपरमध्ये लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

लोकलमधून उतरताना प्रवाशाचा तोल गेला. त्यानंतर हा प्रवासी लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला. प्रवासी अडकल्यानंतर रेल्वे पोलीस आणि प्रवासी मदतीला धावले. पोलिसांनी तातडीने मदत सुरु केली. या घटनेत प्रवाशाच्या छातीला जबर मार लागला होता. या प्रवाशाला लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीतून बाहेर काढलं. त्यानंतर त्याला तातडीने घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालायात दाखल केले. मात्र, या प्रवाशाचा उपचारादम्यान मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi To Akkalkot Travel: शिर्डीहून अक्कलकोट पर्यंतचा प्रवास कसा करावा? ट्रेन, बस आणि खासगी वाहनाचे टिप्स

मित्रांसोबत गेलेला तरुण डॅममध्ये बुडाला; मृत्यूचा थरार LIVE कॅमेऱ्यात कैद

Mumbai: सांगा जगायचं कसं... गुरुपोर्णिमेच्या दिवशीच मुंबईत हजारो शिक्षकांचं आंदोलन

Maharashtra Live News Update : दिल्लीत भूकंपाचे मोठे धक्के

Vidarbha Monsoon Alert : विदर्भाला आजही धो धो पावसाचा अलर्ट, शाळांना सुट्टी, नागरिकांना सर्तकतेचा इशारा

SCROLL FOR NEXT