राम मंदिराच्या नावाखाली महिलेला ३७ लाखांचा गंडा... Saam Tv
मुंबई/पुणे

राम मंदिराच्या नावाखाली महिलेला ३७ लाखांचा गंडा...

राम मंदिराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपींनी महिलेचा विश्वास बसावा यासाठी भस्म, लक्ष्मीमंत्र आणि ताविज पाठवले होते.

सुरज सावंत

मुंबई: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Election 2022) राम मंदीराचा (Ram Mandir) विषय हा चर्चेचा बनला असतानाच, मुंबईत राम जन्मभूमीचे महान गुरुजी असल्याचे सांगत तिघांनी एका महिलेला ३७ लाखांना गंडा (Financial fraud) घातला आहे. दहिसरमध्ये (Dahisar) ही घटना घडली असून तक्रारदार महिलेच्या लग्नासह घरात सुखशांती नांदावी तसेच कौटुंबिक समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी पूजा आणि विधी करण्याच्या नावाखाली ही लूट करण्यात आली आहे. (Fraud of Rs 37 lakh to a woman under the name of Ram Mandir)

हे देखील पहा -

तीन वर्षांपूर्वी तक्रारदार महिलेने टिव्हीवर एक जाहिरात पाहिली होती. त्यात कौटुंबिक समस्येवर पूजा आणि विधीद्वारे सर्व संकटे दूर होतील असे सांगून काही पंडित असलेल्या ज्योतिषांचे मोबाईल क्रमांक दिले होते. या मोबाईलवर फोन करुन तिने तिच्या घरातील समस्यांबाबत माहिती दिली. यावेळी समोरील व्यक्तीने तो ज्ञानेश्‍वर गुरुजी असल्याचे सांगून तिलाविविध उपाय योजनेच्या नावाखाली ही लूट केली आहे. आरोपींनी महिलेचा विश्वास बसावा यासाठी भस्म, लक्ष्मीमंत्र आणि ताविज पाठवले होते. ते ताविज तिला नेहमीच घालण्यास, पाण्यात भस्म टाकून दररोज आंघोळ करण्यास आणि लक्ष्मीमंत्र दिवसातून दोन ते तीन वेळा वाचण्यात सांगण्यात आले होते.

मात्र एवढ्या उपाय योजना करूनही काहीही फरक पडत नसल्याने तिने संबधित गुरूंजींना फोन केला. मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे पीडित महिला अयोध्येतील रामजन्मभूमी येथे संबंधित व्यक्तींची चौकशीसाठी गेली होती. तिथे चौकशी केल्यानंतर तिला ज्ञानेश्‍वर गुरुजींसह इतर कोणत्याही गुरुजींविषयी माहिती मिळाली नाही. गुरुजींनी आपली फसवणुक केल्याचे लक्षात येताच तिने ज्ञानेश्‍वर गुरुजी, मनोहर गुरुजी आणि त्रिकाल गुरुजी यांच्याविरुद्ध एमएचबी पोलिसांत तक्रार (case) केली होती.

पीडितेने घरातील सर्व सोनं गहाण ठेवून कर्ज काढून या गुरूजींना दिले असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेने ज्या खात्यात पैसे पाठवले त्या खात्या़ची झाडाझडती पोलिस घेत आहेत. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची अशाच प्रकारे फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT