Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याणमध्ये नाल्यात वाहून गेलेले बाळ अद्यापही बेपत्ता, व्हायरल फोटो खोटा...

Kalyan Latest News: कल्याणमध्ये नाल्यात वाहून गेलेले बाळ अद्यापही बेपत्ता, व्हायरल फोटो खोटा...

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan Latest News: मुंबईसह अनेक जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस सुरु आहे. अशातच आज दुपारी कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान नाल्यात वाहून गेलेलं बाळ अद्यापही बेपत्ता आहे. बाळाचा शोध सुरु आहे.

याच दरम्यान, एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात नाल्यात वाहून गेलेलं बाळ सापडलं असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र हा दावा खोटा आहे.

व्हायरल होत असलेला फोटो खोटा

व्हायरल होत असलेला फोटोचा कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान घडलेल्या घटनेशी कोणताही संबंध नाही. बाळाचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रयत्न सुरू केले होते. रात्री त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम पोचली होती. मात्र अंधार असल्याने शोध कार्य पूर्ण होऊ शकले नाही. पाण्यात पडलेले बाळ अद्याप सापडू शकले नाही. (Latest Marathi News)

कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान अंबरनाथ लोकल पावसामुळे थांबली होती. या लोकमधून उतरून एक महिला व एक व्यक्ती चार महिन्याच्या बाळाला घेऊन रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या नाल्यावरील अरुंद रस्त्यावरून चालले होते. त्या व्यक्तिच्या हातात असलेले बाळ निसटून नाल्यात पडले. नाल्यातील पाण्याचा प्रवाह खूप जोराचा असल्याने ते बाळ वाहून गेले.

घटनेनंतर बाळाच्या आईने रेल्वे ट्रॅकवरच टाहो फोडला. आपलं बाळ डोळ्यांदेखत पाण्यात वाहून जाताना पाहून आईला अश्रू अनावर झाले आहे. रेल्वेतील एका प्रवाशाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. उद्या सकाळी पुन्हा बाळाचा शोध सुरु केला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT