Raosaheb Danve accident, Lonavala car accident 
मुंबई/पुणे

Raosaheb Danve : रावसाहेब दानवे यांच्या कारला लोणावळ्यात अपघात, दुचाकीची जोरदार धडक

BJP leader accident : लोणावळ्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारला दुचाकीस्वाराची जोरदार धडक, पोलिसांत तक्रार; कुणालाही दुखापत नाही.

Namdeo Kumbhar

Raosaheb Danve accident, Lonavala car accident : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळ्यातील जयचंद चौकात अपघात झाला. काही कामानिमित्त रावसाहेब दानवे हे लोणावळ्यातील बाजारपेठेत आले होते. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने त्यांच्या कारला मागील बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर दुचाकीस्वाराने स्वतःची चूक असतानाही स्थानिक तरुणांना गोळा करून हुज्जत घातली.

कारच्या बाहेर जास्त प्रमाणात गोंधळ सुरू झाल्यानंतर रावसाहेब दानवे गाडीतून बाहेर आले. त्यावेळी उपस्थितांना त्यांची ओळख पटली. दानवे हे माजी केंद्रीय मंत्री असल्याचे समजताच गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न झाला. एका रिक्षाचालकाने मध्यस्थी करत वाद मिटवायचा प्रयत्न केला. पण दुचाकीस्वार काही केल्या ऐकायचं नाव घेत नव्हता. स्वतःची चूक असून देखील दुचाकी स्वाराने स्थानीक तरुणांना गोळा करत दानवे यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालकाने हा वाद मिटवला. या अपघातामुळे लोणावळा बाजारपेठ येथील सीसीटीव्हीचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर दुचाकीस्वाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या अपघातामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. रावसाहेब दानवे यांच्या कारचे आणि दुचाकीचे नुकसान झाले. दानवे आणि दुचाकीस्वारामध्ये १५ मिनिटे वाद सुरू होता. रिक्षाचालकाच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT