Chakan, leopard saam tv
मुंबई/पुणे

Chakan News: तब्बल पाच तासानंतर पकडलेला बिबट्या पाहण्यासाठी चाकण बाजारपेठेत उसळली नागरिकांची गर्दी

बिबट्या शहरात आल्याने नागरिक खूप घाबरले हाेते.

रोहिदास गाडगे

Leopard In Chakan : चाकण शहरात (chakan city) भरवस्तीत आज (बुधवार) सकाळी घुसलेल्या बिबट्याला (leopard) पकडण्यात तब्बल पाच तासांनंतर वनविभागाला (forest department) यश आले आहे. वनविभागाने बिबट्याला पकडल्यामुळे नागरिकांचा (citizens) जीव भांड्यात पडला आहे. (Breaking Marathi News)

चाकण शहरातील बाजारपेठेतील चौकात आज सकाळच्या सुमारास बिबट्या शिरल्याचे वृत्त शहरात वा-या सारखे फिरले. त्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. बिबट्याला पाहण्यासाठी माेठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली.

या घटनेची माहिती कळताच वनविभाग, पाेलिस दल तसेच रेस्क्यु टिम बाजारपेठेत दाखल झाले. परंतु गर्दीमुळे बिबट्याला पकडण्यात पथकास अडचण निर्माण झाली. गर्दी हटविण्यासाठी पाेलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून लांब जाण्याचे आवाहन केले.

त्यानंतर पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी प्लॅन आखला. माणिकडोह बिबट निवारा केंद्राची रेस्क्यु टिम आणि स्थानिक वनविभाग रेस्क्यु टिमने प्लॅननूसार कार्यरत राहिली. बिबट्याला बंदुकीच्या सहाय्याने भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले.

त्यानंतर पथकाने बिबट्याला प्राथमिक उपचारासाठी बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यासाठी नेले. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बाजारपेठेत झाली हाेती. शहरात घुसलेला बिबट्या जेरबंद झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT