एखादा पेंग्विन कमी पाळा पण रस्त्यांवरील खड्डे भरा - नितेश राणेंच महापौरांना पत्र Saam Tv News
मुंबई/पुणे

एखादा पेंग्विन कमी पाळा पण रस्त्यांवरील खड्डे भरा - नितेश राणेंच महापौरांना पत्र

दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे भरण्यास ठोस पाऊल उचलले नाहीत तर, स्वतः रस्त्यावरती उतरु असा इशारा आमदार नितेश राणेंनी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईच्या (Mumbai) रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन (Potholes) भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला (Shivsena) धारेवर धरलं आहे. मुंबईच्या खड्ड्यांच राजकारण थांबता थांबत नाहीय. नितेश राणेंनी मुंबईच्या महापौर (Mumbai's Mayor) किशोरी पेडणेकर (kishori Pednekar) यांना पत्र लिहत ''एखादा पेंग्विन कमी पाळा पण रस्त्यांवरील खड्डे भरा'' असा खोचक टोमणा मारला आहे. तसेच दिवाळीपुर्वी (Diwali) खड्डे बुजवण्यासाठी पावलं न उचलल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (Follow a penguin less but fill the potholes on the roads - Nitesh Rane's letter to the mayor)

हे देखील पहा -

आपल्या पत्रात नितेश राणे म्हणाले की, गेल्या तीस वर्षांपासून मुंबईकरांनी शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगर पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे परंतु या मुंबईकरांच्या विश्वसाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती. परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे.आज मुंबईकर वैतागुन म्हणतोय एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा.'' असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी २२ हजार कोटी खर्च करूनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत मुंबई मनपान सामान्यांनी आपल्या करातून दिलेला हा पैसा खड्ड्यात घातला की कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात? असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न भाजप युवा मोर्चाचे तरुण विचारायला जातात. लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा आमच्यावर दडुकशाहीचा गैरवापर करून लाठी हल्ला केला जातो.

महापालिका आयुक्तांना भिती वाटतेय?

महानगर पालिकेतील सत्ताधारी सेना जर कॉन्ट्रॅक्टरधाजणे निर्णय घेत असेल व आम्ही विचारलेल्या प्रश्नांना दाद देत नसेल तर लोकशाहीने मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा पुर्ण अधिकार आहे. परंतु महापालिका आयुक्तही माझ्या युवा मोर्च्याच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत. याचा अर्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कॉन्ट्रॅक्टरच्या संगनमताने सताधारी सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय किंवा त्यामुळेच भाजप युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याची महापालिका आयुक्तांना भिती वाटतेय? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी स्वतः रस्त्यावरती उतरू

सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मागणाऱ्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता तुम्ही दाखवली तीच तत्परता रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आपण दाखवाल, अन्यथा दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे उचलण्यात ठोस पाऊल उचलले नाहीत तर मी आणि माझे भाजपा युवा मोर्चाचे सहकारी यांना सोबत घेऊन मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी स्वतः रस्त्यावरती उतरू असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांना देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT