culprit arrested  Saam Tv
मुंबई/पुणे

वसईत दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ (Bike Robbery) होताना दिसत आहे. वसई परिसरातही दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोड्याही करत आहेत. वसई परिसरात चोरीच्या घटनांना (Vasai Robbery Crime) आळा घालण्यासाठी पोलिसांनीही कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वसई वालीव पोलिसांनी पाच दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या (Five culprit arrested) आवळल्या असून त्यांच्याकडूनल एकूण ५ लाख ६६ हजार किमतीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईत झालेल्या चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी वालीव पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. दुचाकी चोरणाऱ्या पाच चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर १८ दुचारी चोरी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

प्रमुख आरोपी सलीम शेख हा कॅटरर्सचे काम करत होता. रात्री घरी येताना उशीर झाला की, रस्त्यात दिसणाऱ्या कोणतीही दुचाकी घेऊन तो पसार व्हायचा. त्याचे मित्र हे चोरीच्या दुचाकी विकण्याचे काम करत होते. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Care Tips : चुकीचा फेसवॉश वापरताय! जाणून घ्या तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश योग्य

Chia Seeds Benefits: चिया सीड्सचे पाणी पिऊन कंटाळा आलाय? ट्राय करा खाण्याचे ७ चविष्ट अन् हेल्दी पर्याय

Maharashtra News Live Update: वंचितांचा आवाज म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचं कार्य केलं- देवेंद्र फडणवीस

Namo Shetkari Yojana : कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 'नमो शेतकरी' योजनेचा लाभ मिळणार नाही? 56 लाख शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

SCROLL FOR NEXT