drowned ,  SaamTv
मुंबई/पुणे

जिगरबाज मच्छिमारांनी समुद्रात मारल्या उड्या; वाचविले युवतीचे प्राण

नालासाेपारा येथील युवतीने आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता.

चेतन इंगळे

भाईंदर : भाईंदर (bhayander) व नायगाव (naigoan) रेल्वे स्थानका दरम्यान असलेल्या रेल्वे (railway) पुलावरून एका १६ वर्षीय युवतीने समुद्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शनिवारी संध्याकाळी घडली. दरम्यान स्थानिक मच्छिमारांनी याची कुणकुण लागताच त्यांनी युवतीचे प्राण वाचविले. या संपूर्ण घटनेचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (bhayander latest marathi news)

घटनास्थळावरुन तसेच पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या एका युवतीने मानसिक तणावातून नायगाव व भाईंदर रेल्वे स्थानक जोडणाऱ्या रेल्वे पुलावरुन उडी मारली. ही युवती बराच वेळ पुलाकडेला उभी असल्याने समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांची नजर तिच्यावर पडली हाेती. काही तरी घडणार याचा अंदाच मच्छिमारांना आला. त्यांनी रेल्वे पोलिसांना माहिती देण्याआधीच युवतीने समुद्रात उडी मारली.

त्यानंतर मच्छिमारांनी मोठ्या जिगरीने बुडणाऱ्या युवतीपर्यंत पोहचून तिचे प्राण वाचविले. त्यानंतर एका छोट्या बीटीच्या मदतीने तिला समुद्रकिनाऱ्यावर आणण्यात आले. ही युुवती नालासोपारा परिसरात राहणारी असल्याची माहिती मिळत असून तिचे आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई, ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

दक्षिणेत वारं फिरलं,भाजपचं टेन्शन वाढलं! इंडिया आघाडीत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री

खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

SCROLL FOR NEXT