17-Year-Old Heart Transplant saam tv
मुंबई/पुणे

Heart Transplant: वाडिया रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वी हृदय प्रत्यारोपण, 17 वर्षीय मुलाला नवं आयुष्य; ग्रीन कॉरिडॉरमुळे 25 मिनिटांत पोहोचलं हृदय

17-Year-Old Heart Transplant: मुंबईतील वाडिया रुग्णालयात १७ वर्षीय मुलावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. हृदयाची कार्यक्षमता १० ते १५ टक्क्यांवर घसरली होती. २२ वर्षीय ब्रेन डेड तरुणाच्या अवयवदानामुळे आणि ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने मुलाला नवे आयुष्य मिळाले.

Surabhi Jayashree Jagdish

गंभीर हृदयविकारामुळे जीवाला धोका निर्माण झालेल्या १७ वर्षीय मुलावर मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनमध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. वाडिया हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झालीये.

या मुलाच्या हृदयाची कार्यक्षमता केवळ १० ते १५ टक्क्यांपर्यंत घसरली होती. योग्य दात्याचं हृदय उपलब्ध झाल्यानंतर ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने मुलुंडमधून ते अवघ्या २५ मिनिटांत रुग्णालयात आणण्यात आलं. बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

नवी मुंबईतील घणसोलीमध्ये राहणाऱ्या या मुलाला १ डिसेंबर रोजी डायलेटेड कार्डिओमायोपॅथी या हृदयाच्या गंभीर समस्येचं निदान झाल. या आजारात हृदयाचं स्नायू कमकुवत होतात आणि शरीराला आवश्यक असलेलं रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते. सुरुवातीला त्याच्या हृदयाची कार्यक्षमता २५ ते ३० टक्के होती. पुढे ती १० ते १५ टक्क्यांपर्यंत घसरली. अतिदक्षता विभागातील उपचार आणि औषधांमुळे ती काही प्रमाणात सुधारली. मात्र, त्याची प्रकृती नाजूकच होती.

वाशीच्या रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं होतं. मात्र धाप लागणं, छातीत दुखणं आणि थकवा जाणवू लागल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागलं. १५ डिसेंबर रोजी त्याला वाडिया रुग्णालयात आणण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणीनंतर हृदय प्रत्यारोपणाची गरज असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरच्या (ZTCC) माध्यमातून त्याचं नाव प्रतीक्षा यादीत नोंदवण्यात आलं. २८ जानेवारीला त्याला घरी सोडण्यात आले होते, मात्र प्रकृती नाजूक असल्याने पुढेही वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागत होते.

२२ वर्षीय तरुणाच्या अवयवदानामुळे मिळालं नवं आयुष्य

६ ऑक्टोबर रोजी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात २२ वर्षीय ब्रेन डेड तरुणाच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर आवश्यक तपासण्या आणि ZTCC च्या नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून त्याचं हृदय या मुलासाठी उपलब्ध झालं. हृदय प्रत्यारोपणासाठी रक्तगटासोबतच दाता आणि रुग्णाचं वय, वजन आणि शरीराचा आकारही महत्त्वाचा असतो.

दात्याचे हृदय दान केल्यांतर ते कमी वेळेत रुग्णापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. ग्रीन कॉरिडॉरमुळे मुलुंड ते वाडिया रुग्णालय हे २३.९ किलोमीटरचं अंतर अवघ्या २५ मिनिटांत पार करण्यात आले. दात्याची शस्त्रक्रिया सुरू असतानाच डॉक्टरांनी मुलाला प्रत्यारोपणासाठी तयार केलं होतं. हृदय रुग्णालयात पोहोचताच शस्त्रक्रिया सुरू झाली. शस्त्रक्रियेनंतर प्रत्यारोपित हृदयाने पुन्हा नियमितपणे काम सुरू केले. हृदयाची धडधड थांबल्यापासून ते नव्या शरीरात पुन्हा सुरू होईपर्यंतचा कालावधी सुमारे तीन तासांचा होता.

पुढे नियमित तपासण्या आवश्यक

शस्त्रक्रियेनंतर मुलाला सात दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलंय. आता तो जेवण, चालणं आणि दैनंदिन हालचाली हळूहळू करू लागलाय. त्याच्यावर कार्डियाक रिहॅबिलिटेशन आणि फिजिओथेरपीचे उपचारही सुरू आहेत.

मात्र, त्याला अद्याप घरी सोडण्यात आलेलं नाही. प्रत्यारोपित हृदय शरीर स्विकारतंय की नाही हे तपासण्यासाठी बायोप्सी केली जाणार आहे. त्यानुसार औषधांमध्ये बदल होतील. शरीराने हृदय नाकारण्याचा धोका कमी करण्यासाठी त्याला आयुष्यभर रोगप्रतिकारशक्ती नियंत्रित करणारी औषधं घ्यावी लागतील.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची

मुलाचे वडील बसचालक असून आई गृहिणी आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उपचारांचा खर्च उभा करणं कठीण होतं. मात्र निधी संकलनातून प्रत्यारोपणाच्या खर्चाची व्यवस्था करण्यात आली. हा मुलगा नवी मुंबईतील महाविद्यालयात बारावीत शिकत होता. आजारामुळे त्याला महाविद्यालयात जाणं आणि परीक्षेला बसणं शक्य झालं नाही. आता प्रकृती सुधारल्यानंतर पुढील वर्षी बारावीची परीक्षा देता येईल, अशी आशा त्याच्या पालकांनी व्यक्त केली.

बालकांच्या अवयवदानाबाबत जनजागृती गरजेची

डॉ. बिस्वा पांडा यांच्या म्हणण्यानुसार, प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये हृदय प्रत्यारोपण कमी प्रमाणात होतं. योग्य आकाराचं हृदय उपलब्ध होणं हे मोठं आव्हान आहे. त्यामुळे बालकांसह अवयवदानाबाबत जनजागृती होणं गरजेचं आहे. योग्य वेळी अवयव मिळाल्यास गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या मुलाला नवे आयुष्य मिळू शकते.

वाडिया रुग्णालयाच्या हृदय निकामी झालेल्या बालरुग्णांसाठी असलेल्या विशेष केंद्रात सध्या सुमारे ३०० मुलांवर उपचार आणि नियमित तपासणी केली जाते. मुलांमधील आजारांचे लवकर निदान आणि गरजेनुसार प्रगत उपचार यावर भर दिला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mega Block : रविवारी प्रवाशांचे मेगाहाल होणार! तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; वाचा वेळापत्रक

Rice or Chapati: भात की चपाती? शरीराला जास्त एनर्जी, फायबर आणि प्रोटीन कशातून मिळते? जाणून घ्या ७ गोष्टी

Maharashtra News Live Update: 9 व्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेचा समारोप सोहळा

Railway Block : देहूरोड–बेगडेवाडी दरम्यान उद्या रेल्वे ब्लॉक; लोकल रद्द, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळेत बदल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! या महिन्याच्या शेवटी खात्यात पैसे जमा होणार , ₹1500 की ₹3000 मिळणार? वाचा...

SCROLL FOR NEXT