Firing by unknown person at house Korean citizen Aundh area Pune Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात कोरियन नागरिकाच्या घरावर गोळीबार; औंध परिसरातील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल

Pune Crime News: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील औध परिसरात एका कोरियन नागरिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला.

Satish Daud

Pune Crime News

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील औध परिसरात एका कोरियन नागरिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केला. मंगळवारी (६ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. याप्रकरणी रदेशी नागरिकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा गोळीबार (Crime News) नेमका कुणी केला? याचा तपास पोलीस (Police) करीत आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार परदेशी नागरिक मूळचा दक्षिण कोरियातील आहे. ते चाकण भागातील एका खासगी कंपनीत कामाला आहेत.

परदेशी नागरिक पत्नी आणि मुलासह बाणेर भागातील (Pune News) एका उच्चभ्रु सोसायटीत वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री तक्रारदार आपल्या पत्नी आणि मुलांसह घरात झोपले असता अज्ञात आरोपींनी त्यांच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात घराच्या खिडकीची काच फुटली.

गोळीबारामुळे तक्रारदार व्यक्तीसह त्यांचे कुटुंबीय धास्तावले. त्यांनी तातडीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना तिथे एक पुंगळी आढळून आली.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरात सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे कायद्याचा धाक संपला की काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT