Pune Saam Tv
मुंबई/पुणे

मृतदेहाला अग्नी देताना अचानक उडाला भडका; 11 जण जखमी

स्मशानभूमीत मृतदेहला अग्नी देत असताना अचानक भडका उडाल्याने ११ जण जखमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे: स्मशानभूमीत मृतदेहला अग्नी देत असताना अचानक भडका उडाल्याने ११ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. पुण्यात संगमवाडी भागात कैलास स्मशानभूमीत (Cemetery) ही धक्कादायक घटना घडली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे. (fire broke out while setting fire to a dead body in a cemetery 11 injured)

हे देखील पाहा-

या घटनेत ११ जण जखमी झाले असून, २ जण गंभीररित्या जखमी झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अचानक भडका उडण्याच्या घटनेचा पोलीस (Police) तपास करत आहेत. अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमवाडी कैलास स्मशानभूमीत एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या व्यक्तीचे नातेवाईक आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतव्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेहावर ठेवण्यात आलेल्या लाकडांवर ज्वलनशील पदार्थ टाकला होता. यानंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला. यावेळी अचानक भडका उडाल्याने जवळ उभे असलेले ११ जण जखमी झाले आहेत. तर २ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, यातील सर्व जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT