Viral VIdeo  Saam TV
मुंबई/पुणे

Bike Stunt Video: थरारक! बाईकवरील स्टंटबाजी पडली महागात; काळीज घट्ट करुन पाहा मुंबईतील रस्त्यांवर काय चाललंय

Mumbai Bike Stunt Video: मुंबई पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News : सोशल मीडियाच्या जगात तरुणांची लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. यात रिल्स आणि सोशल मीडियाच्या (Viral Video) नादात अनेकांचा बळी देखील गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र तरुणाईवर याचा काहीही फरक पडताना दिसत नाही.

मुंबईतही एक तरुण आणि दोन तरुणींचा बाईकवर स्टंट करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र स्टंट करणं तिघांना चांगलच महागात पडलं आहे. चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai News)

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ वांद्रे- कुर्ला कॉम्पेक्स येथील आहे. व्हिडीओतील दृष्यांनुसार एक तरुण बाईक चालवताना दिसत आहे. तर एक तरुणी त्याच्या मागे तर एक मुलगी त्याच्या पुढे बसली आहे. ट्रिपल सीट बसून यांनी वाहतूक नियमांची अक्षरश: ऐसीतैसी केली.  (Latest Marathi News)

मात्र त्यांची स्टंटबाजी इथेच थांबली नाही, तर मुलाने त्यानंतर वेगात असलेल्या बाईकचं पुढचं चाक वर करत व्हीली मारली. व्हिडीओ बघताना या स्टंटबाजीचा थरार तुम्हाला अनुभवता येईल. कारण या स्टंटबाजी दरम्यान एखादी चूक झाली असती तर होत्याचं नव्हतं झालं असतं.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. चार अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक अन्सारी यांनी मुंबई पोलिसांना टॅग करत हा व्हिडिओ ट्वीट केला होता. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी भारतीय दंड संहिता 114, 279, 336 आणि 34 आणि मोटार वाहन कायद्याचे कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मोदींना मंत्रिमंडळात फडणवीस हवेत'; मोदी-फडणवीस भेटीनंतर राऊतांचा दावा

Pune Roads Pothole: खड्ड्यांनी घेतला शाळकरी मुलाचा जीव; वडिलांसोबत ट्युशनला जाताना घडली दुर्घटना

महाराष्ट्रात 2 कोटी मतदार वगळणार? 'अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्यासाठी SIR' , वडेट्वीवारांचा आरोप

Delhi : दिल्लीतील दिग्गज नेत्यासह ६ जणांना अटक; माजी CEO आणि IAS अधिकाऱ्याचाही समावेश, एसीबीची सर्वात मोठी कारवाई

Kumbh Mela Tender Scam: जळगावात कुंभमेळा बोगस टेंडरचा छापखाना; बिंग कसं फुटलं? घोटाळ्याची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT