Mehboob Shaikh Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Mehboob Shaikh: राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख गोत्यात; मरीन ड्राईव्ह पोलिसांत ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Mehboob Shaikh Controversy: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Satish Daud

Mehboob Shaikh Latest News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अ‍ॅट्रोसिटीच्या कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. मेहबूब शेख हे आमदार निवासमधील खोली क्रमांक ४०६ मध्ये असताना त्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे या प्रकरणी फिर्यादी तरुणावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी दोघांवरही क्रॉस एफआयआर दाखल केला आहे. मेहबुब शेख यांची रात्री उशिरापर्यंत मरीन ड्राईव्ह पोलीस चौकशी करीत होते. याप्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

मेहबुब शेख हे गुरुवारी (२८ डिसेंबर) मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास येथील खोली क्रमांक ४०६ मध्ये थांबले होते. यावेळी एक तरुण मद्यधुंद अवस्थेत तिथे आला आणि शेख यांच्याकडे मुक्कामाचा हट्ट करू लागला.

मद्यधुंद अवस्थेत असल्याने शेख यांनी या तरुणाला खोलीवर येण्यास मज्जाव केला. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर शिवीगाळ केल्याने मेहबूब शेख यांच्याकडून मारहाण झाल्याचा आरोप फिर्यादी तरुणाने केला आहे.

मेहबूब शेख यांनी जातीवाचक शिवीगाळ करून आपल्याला मारहाण केल्याच्या आरोप तरुणाने केला. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार फिर्यादीने केली. या प्रकरणी पोलिसांनी (Police) मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मेहबूब शेख यांना चौकशीसाठी बोलावले होते.

गुरुवारी दुपारी १ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत मेहबूब शेख यांची चौकशी सुरू होती.जवळपास ७ तासांच्या चौकशीनंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मेहबुब शेख यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणाविरोधात देखील गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT