Hill Line Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

अखेर दोन वर्षांनंतर अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या आरोपीला अटक

हिल लाईन पोलिसांच्या अथक तपासाला यश; अल्पवयीन मुलगी अन् तिच्या बाळाची बंगाल मधून सुटका

अजय दुधाणे

उल्हासनगर - हिल लाईन पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दितील भालगाव येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष देऊन मोहम्मद शेख याने दोन वर्षा पुर्वी पळवून नेले होते. या प्रकरणाचा तपास हिललाईन पोलीस करत होते. पोलिसांच्या या अथक तपासाला अखेर यश आले आणी दोन वर्ष मुलीला पळवून नेणारा नराधम अटक झाला. तसेच अल्पवयीन मुलीसह तीचं बाळ देखील सुखरूप महाराष्ट्रात पोहचलं आहे.

हे देखील पाहा -

हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्ददीत असलेल्या भाल गांव येथील राहाणारे हसिपुर रहेमान यांनी २० जून २०२० रोजी त्यांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार हिल लाईन पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यानुसार कलम ३६० नुसार तपास सुरू होता.तपासा दरम्यान माहिती मिळाल्या नंतर पोलिसांचे एक पथक पश्चिम बंगाल येथील मुर्शीदाबाद जिल्ह्यात आरोपी मोहम्मद शेख उर्फ अली आणि मुलगी मिळून आली.

हिललाईन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात हजर केले. या प्रकरणी हिललाईन पोलिसांनीआरोपीला न्यायालयात हजर केले असता पोलिस रोमांड देण्यात आलंआहे. अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT