धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाची आत्महत्या

दिवाळीच्या सणात देखील पोलीस कर्मचारी आपले कर्तृव्य पार पाडत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दौंड : सर्वत्र दिवाळीची diwali धामधूम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दिवाळीच्या सणात देखील पोलीस कर्मचारी आपले कर्तृव्य पार पाडत आहे. पण पुणे pune जिल्ह्यामधील दौंड तालुक्यात पोलीस कर्मचाऱ्याच्या police त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यामधील देलवडी या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. दीपाली बापूराव कदम असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस दलात एका पोलीस कर्मचाऱ्यावर आरोप करत महिला पोलिसाने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेल्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दीपाली या वसई या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होती.

हे देखील पहा-

दीड महिन्याअगोदर तिचे लग्न भोसरी येथील एका तरुणाशी ठरले होते. दरम्यान आरोपी वाल्मिक गजानन आहिरे हा दिपालीला वारंवार फोन करत आणि मानसिक त्रास देत होता. लग्न जमल्यानंतर सासरच्या मंडळींना आरोपी वाल्मिक आहिरे याने फोन करून, जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा विवाहित होता. तरी देखील दीपालीला वारंवार त्रास देत होता.

दीपालीच्या भावाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्याने त्यालाही दमबाजी करून, जीवे मारण्याची धमकी दिली होती. या त्रासाला कंटाळून दिपालीने देलवडी या ठिकाणी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी वाल्मिक गजानन आहिरे याच्यावर यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाल्मिक आहिरे हा पालघर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे. मृत दीपालीच्या भावाने यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी वाल्मिक आहिरे विरोधात कलम ३०६, ५०४, ५०६ नुसार यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुनी पेन्शनचा मार्ग मोकळा, अर्जाची शेवटची तारीख समोर

Maharashtra News Live Update:दुष्काळाचा संत्र पिकाला मोठा फटका

Pitru Paksha : पितरांसाठी बनवा खीर-पुरीचा नैवेद्य, स्वादिष्ट प्रसादाची सोपी रेसिपी

Neem Water Bath Benefits: कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे ५ जबरदस्त फायदे; त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर

Silver Anklet Designs : लाडक्या नातीसाठी चांदीचे खास पैंजण, ८ नवीन डिझाईन्स पाहाच, लहान मुलींवर दिसतील खूपच सुंदर

SCROLL FOR NEXT