Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न, वडिलांचा मृत्यू; हडपसरमधील घटनेने खळबळ

Pune News: जेवणातून विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News : पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. आई वडील आणि मुलाने विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कॅन्सर सारख्या आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील हडपसर भागात ही घटना घडाली असून यामध्ये वडिलांचा मृत्यू झाला आहे. सूर्यप्रकाश अबनावे (७२), चेतन अबनावे (४०) आणि जनाबाई अबनावे (६०) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, चेतन अबनावे हा स्वतः आजारी असायचा त्याला अनेक वेळा फीट येत असत. शिवाय त्याच्या आईला कॅन्सर होता. आजारपणाला कंटाळून या तिघांनी जीवन संपवायचं ठरवल्याचं कळतंय. (Crime news)

आज संध्याकाळी तिघांनी हडपसर येथील राहत्या घरी जेवणातून विषप्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात वडिलांचा मृत्यू झाला तर आई आणि मुलगा हे शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे बचाचले आहेत. (Latest News Update)

शेजारी राहत असलेल्या नागरिकांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांना सूर्यप्रकाश यांना मृत घोषित केलं चेतन आणि जनाबाई यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातपुड्याच्या दुर्गम भागात पोळा सणाचा उत्सव

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT