पुण्यातील कबड्डीपटूच्या खुनाचा 12 तासात उलगडा; सर्व आरोपी अटकेत Saam Tv
मुंबई/पुणे

बापानेच केला सावत्र मुलाचा खून; आरोपी ३ तासात पोलिसांचा ताब्यात

झाडीत लपलेल्या आरोपीला तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बारामती  - पारवडी येथे कोयत्याने वार करून बापाने सावत्र मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झाडीत लपलेल्या आरोपीला तालुका पोलीस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाने अटक केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी अधिक माहिती दिली आहे. पोलिसांनी सावत्र मुलाचा खुन करुन पसार झालेला आरोपी ३ तासाच्या आत अटक केली आहे. 

हे देखील पहा -

पारवडी गावच्या पोलीस पाटीलांनी कातकरी समाजातील एकाने स्वतःच्या सावत्र मुलाचा कोयत्याने वार करुन खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे घटनास्थळी दाखल झाले. मारुती साधुराम जाधव मजुरीचे काम करायचा. त्याचे आपल्या सावत्र मुला गोपीनाथसोबत काही घरगुती कारणावरून भांडण झाले होते.  

त्या रागात मारुतीने स्वतःच्या मुलाच्या डोक्यात कोयत्याने वार करत खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाला. आरोपी अटक करण्यासाठी गुन्हेशोध पथकाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली. सदर आरोपी अटक करणे जिकीरीचे काम होते कारण आरोपी मोबाईल वापरात नव्हता. तसेच त्याचे कोणी नातेवाईक देखील नव्हते.  पोलीस निरीक्षक ढवाण यांच्या सूचने प्रमाणे गुन्हेशोध पथकाने घटना स्थळापासून १० ते १५ किमी चा टप्पा पायी चालत शोधमोहीम राबवली. त्यानंतर झाडीत लपलेल्या आरोपीस पोलिसांनी अवघ्या ३ तासात ताब्यात घेतले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT