Crime News saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime News : मित्रानेच केला घात, उल्हासनगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला

Crime news : हल्ला करणारा तरुण हा जखमीचा मित्र असून, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अजय दुधाणे

Ulhasnagar News :

उल्हासनगरमध्ये तरुणावर चाकूने सपासप वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री कॅम्प क्रमांक दोन येथील पवन ज्यूस सेंटरजवळ ही घटना घडली आहे. अय्याज मोहम्मद खान या तरुणावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

जखमी तरुणास फसवून मोटार सायकलवर बसवून त्याच्या पाठीत, डोक्यात, मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. हल्ला करणारा तरुण हा जखमीचा मित्र असून, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण झाले होते. जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हल्ला करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. तर जखमी तरुणांची प्रकृती गंभीर असल्याने रात्री उशिरा त्याला मुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (Crime News)

गावठी पिस्टलसह सराईत गुन्हेगार अटकेत

उल्हासनगरमध्ये गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह एका सराईत गुंडाच्या मुसक्या आवळण्यात उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांना यश आले. संतोष मोहिते असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून तो कॅम्प ५ च्या अब्बू हॉटेलमध्ये गावठी पिस्टल कमरेला लावून बसला असल्याची गुप्त माहिती हिललाईन पोलिस ठाण्यातील बाबू जाधव यांना माहिती मिळाली होती. या माहितीवरून हिललाईन पोलीस स्टेशनच्या पथकाने अब्बू हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री ११.३० वाजता सापळा रचून संतोष याला ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT