Maval saam tv
मुंबई/पुणे

Maval News : आमदार महेश लांडगेंच्या 'त्या' मागणीस मावळ भाजपसह शेतकऱ्यांचा विराेध

पवना बंधिस्त जलवाहिनी प्रकल्प पूर्णतः बंद करा अशी मागणी हाेऊ लागली आहे.

दिलीप कांबळे

Maval News : निष्पाप शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केलेल्या घटनेला आज बारा वर्षे पूर्ण झाली परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. दरम्यान पवना बंधिस्त जलवाहिनी प्रकल्प पूर्णतः बंद करा अशी मागणी आज ग्रामस्थांनी केली. (Maharashtra News)

क्रांती दिनी ऑगस्ट 2011 मध्ये पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला बंदिस्त जलवाहिनीतून पाणी मिळणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात न घेतल्यामुळे मुंबई पुणे द्रुतगतीमार्ग रोखण्यात आला होता. यानंतर झालेल्या घटनेत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

यात त्यावेळचे विरोधी भाजप-शिवसेना भारतीय किसान संघ यांच्यासह या भागातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला हाेता. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा उपस्थित करून गोळीबार केला गेला. यात तीन ग्रामस्थांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

त्यांच्या मुलांना जरी नोकरी मिळाली असल्या तरी अजूनही पंचायत समितीला हुतात्मा यांची नावं दिली गेली नाहीत. त्याबाबतचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते मात्र अजूनही तो प्रश्न प्रलंबित राहिला.

एकीकडे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे जलवाहिनी सुरू झाली पाहिजे असे म्हणतात तर दुसरीकडे मावळ भाजप आणि शेतकऱ्यांचा या बंद जलवाहिनीस विरोध आहे. राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार आहे.

वर्ष उलटताहेत नेते आश्वासन देऊन जातात मात्र आमचे प्रश्न आहे तसेच आहेत असे अमित कुंबर, रवींद्र भेगडे यांच्यासह शेतक-यांनी साम टीव्हीशी बाेलतना स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आंदोरा गावात पार पडला बळीराजा महोत्सव

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT