Pune University Saam Tv
मुंबई/पुणे

Pune University: पुणे विद्यापीठात बोगस डिग्री घोटाळा? ३ लाखांत मिळतेय पदवी, काय आहे नेमकं प्रकरण?

Pune University Degree Scam: पुणे विद्यापीठातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. विद्यापीठामध्ये ३ लाखांत डिग्री मिळत आहे. हे बनावट डिग्री घोटाळा समोर आल्याने खळबळ उडाली.

Priya More
  • पुणे विद्यापीठातील बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश

  • बीकॉम डिग्रीसाठी ३ लाख रुपये मागितल्याचा दावा

  • रिक्षाचालक महेश कदम यांच्या तक्रारीमुळे प्रकरण उघडकीस

  • संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात खातेअंतर्गत चौकशी सुरू

सागर आव्हाड, पुणे

'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी आणि कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे विद्यापीठातील हे रॅकेट उघडकीस आला आहे. पुणे विद्यापीठातील बनाव डिग्री रॅकेटचा पर्दाफाश कसा करण्यात आला.

रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या महेश कदम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात चौकशी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर या अधिकाऱ्याने त्याच्या अन्य ३ ते ४ साथीदारासह महेश कदम यांना ३ लाख रुपयांत बीकॉमची डिग्री सर्टिफिकेट देण्याचे कबुल केले. परंतु युनिव्हर्सिटी ऑफ पुणे साहिल महेश कदम यांना बीकॉमची डिग्री सर्टिफिकेट दिल्यानंतर महेश कदम यांना संशय आला. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव असताना युनिव्हर्सिटी ऑफ पुणे या नावाने डिग्री सर्टिफिकेट का देता? अशी विचारणा केली.

मुखेकर यांनी कदम यांना वेगवेगळ्या वर्षांचे चार डिग्री सर्टिफिकेट दिल्यामुळे कदम यांना संशय आला. त्यांनी ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तातडीने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी देखील केली. या संदर्भात कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे पत्र देखील दिले. परंतु तब्बल एक महिन्यानंतर पाठपुराव्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून मुखेकर यांचे खाते अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे.

विद्यापीठ प्रशासनाकडून एक महिन्यानंतर का होईना परंतु संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासकीय कार्यवाहीला सुरुवात केली आहे. रमेश मुखेकर आणि अन्य कर्मचाऱ्यांची खाते अंतर्गत चौकशी सुरू झाली असून दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हा देखील केला नाही. विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचारीच लाखो रुपये घेऊन बनावत डिग्री सर्टिफिकेट देत असल्याच्या प्रकारानंतर 'आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय' अशीच अवस्था झालीय.

एका रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री प्रमाणपत्र देण्याचे रॅकेट उघड झालं खरं, परंतु दोषी अधिकारी व कर्मचारी यांना कठोर शासन झाल्याशिवाय शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आटोक्यात येणार नाही. याबाबत प्रशासन गुन्हा दाखल कधी करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT