डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात CBI ने न्यायालयात सादर केले पुरावे  Saam TV
मुंबई/पुणे

डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात CBI ने न्यायालयात सादर केले पुरावे

सर्व आरोपींच्या वकिलांनी पुराव्यांशी संबंधित १३ कागदपत्रे अमान्य असल्याचे न्यायालयात सांगितले आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) न्यायालयात पुरावे सादर केले आहेत. सर्व आरोपींच्या वकिलांनी पुराव्यांशी संबंधित १३ कागदपत्रे अमान्य असल्याचे न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे सीबीआय ला साक्षीदारांची यादी देऊन संबंधीत कागदपत्रे सिद्ध करावी लागणार आहेत. आरोपींनी नाकारलेले पुरावे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची यादी सादर करण्यास सीबीआयने काही दिवसांची मुदत देखील मागितली आहे. विशेष न्यायाधीश एस.आर.नावंदर यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) हत्या प्रकरणातील पाच आरोपींवर दोषारोप निश्चीत झाले होते . विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे Sachin Andure , शरद कळसकर Sharad Kalaskar, अॅड. संजीव पुनाळेकर Sanjiv Punekar आणि विक्रम भावे Vikram Bhave यांच्यावर आरोप निश्चिती झाली आहे.

मागच्या सुनावणीला अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे प्रत्यक्ष उपस्थित होते बाकी आरोपी ऑनलाइन उपस्थित होते. दोषारोप निश्चित झाल्यानंतर आता खटला सुरु होणार आहे. पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सध्या जामिनावर आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT