Devendra Fadnavis saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: 'शिवसेना, राष्ट्रवादी सोबत आले तरी भाजपच बॉस', उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य

Devendra Fadnavis: 'शिवसेना, राष्ट्रवादी सोबत आले तरी भाजपच बॉस', उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य

Satish Kengar

Devendra Fadnavis News:

'भाजप हा नेहमीच बॉस राहिला पाहिजे', असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आले तरी भाजपचं बॉस राहिला पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. भाजपच्या विस्ताराकांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

स्वतःसाठी दहा, तर पक्षासाठी 14 तास द्या, तसेच गाव, जिल्हा पातळीवरील प्रभाविक व्यक्तींना संपर्क करा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. दादर येथे भाजप लोकसभा आणि विस्तारकांची बैठक पार पडली. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्यासोबत सेना, राष्ट्रवादी जरी असली तरी राज्यात भाजपच बॉस राहिला पाहिजे. समन्वय साधून युतीमधील सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे.  (Latest Marathi News)

मी इथे उभा आहे तो पक्षामुळे: फडणवीस

फडणवीस म्हणाले की, मी इथे उभा आहे तो पक्षामुळे. मी पक्ष सोडून उभा राहिलो, तर माझेही डिपॉझिट जप्त होईल. ते पुढे म्हणाले, स्वतःसाठी 10 तास, तर पक्षासाठी 14 तास द्या. मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम विस्तारकांना करायचे आहे, असं विस्तारकांना ते म्हणाले.

दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या मुंबई समन्वयक समितीच्या बैठकीला राष्ट्रवादीला निमंत्रण देण्यात आलं नाही. भाजप शिवसेना युतीच्या मुंबई समन्वय समितीची रविवारी गरवारे येथे महत्वाची बैठक झाली. या बैठकिला मुंबईचे दोन्ही पालकमंत्री व भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. बैठकितील युतीच्या नेत्यांनी आपआपसात समन्वय ठेवून कार्यक्रम घ्यावे. सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकिला मात्र राष्ट्रवादीला निमंत्रण नसल्याने महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT