Kalyan Shilphata Road Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC News: कल्याण शिळ मार्गावरील अवजड वाहनांना होणार प्रवेश बंदी, केडीएमसी आणि पोलिसांच्या बैठकीत निर्णय

Kalyan Shilphata Road: कल्याण शिळ महामार्गावर वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट बनला आहे. यावर तोडगा म्हणून या महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली जाणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण प्रतिनिधी

मेट्रोच काम सुरू असल्याने सध्या कल्याण शिळ महामार्गावर वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट बनला आहे. विशेषतः शालेय बस, रुग्णवाहिका यांना इथल्या वाहतूक कोंडीचा सगळ्यात जास्त फटका बसतो. यावर तोडगा म्हणून या महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली जाणार आहे.

कल्यान डोंबिवली महापालिका, वाहतूक विभाग आणि पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या संबंधी दोन ते तीन दिवसात अधिसूचना निघणार आहे. सकाळी 06 ते सकाळी 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना इथे प्रवेश बंदी असणार आहे. अवजड वाहनांना बंदी झाल्यास वाहतूक कोंडीतुन वाहनचालक,शालेय बस आणि रुग्णवाहिकांना दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्टेशन परिसरात निर्माण होणाऱ्या वाहतुक कोंडीबाबत केडीएमसी मुख्यालयात नुकतीच महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांच्यासमावेत वाहतूक पोलीस आरटीओ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडी होते त्यामुळे वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी यांनी गर्दीच्या वेळी स्वतः उपस्थित राहून स्टेशन परिसरात वाहतुकीचे नियोजन करावे, आशा सूचना करण्यात आल्या तसेच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पथक नेमण्यात आलाय. स्टेशन परिसरात सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनुसार फेरीवाले राहणार नाहीत या अनुषंगाने दक्षता घेणार असून सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी सांगितले.

तत्काळ खड्डे भरण्याचे आदेश

पावसाळ्यात कल्याण मुंबईमध्ये काही रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याबाबत बोलताना आयुक्त इंदू राणी जाखड यांनी महापालिका क्षेत्रात काही रस्ते एमएसआरडीसी, काही एमएमआरडीए मार्फत सुरू आहे. कल्याण शिळफाटा रोड हा एमएसआरडीसीकडे आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डे भरण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

पाऊस जास्त पडल्यावर खड्डे निर्माण होतात त्यामुळे तत्काळ खड्डे भरण्याचा सूचना करण्यात आल्यात. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील खड्ड्यांसाठी महापालिकेकडून निविदा काढण्यात आल्या आहेत. जिथे खड्डे आहेत तिथे तत्काळ खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आलंय. खड्डया संदर्भात तक्रार असल्यास महापालिकेच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन आयुक्तांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanscreen For Winter: हिवाळ्यात तुमच्या त्वचेसाठी कोणतं सनस्क्रीन आहे बेस्ट, एकदा जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात पहाटे भीषण अपघात

Shocking : धक्कादायक! 45 प्रवाशांनी भरलेली खासगी बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी, नागपुरात खळबळ

Jaggery vs Sugar: साखरेऐवजी गूळ खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे का? तज्ज्ञांनी सांगितले फायदे

Jowar vs Bajra Bhakri: ज्वारी की बाजरी, वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी योग्य?

SCROLL FOR NEXT