Manasvi Choudhary
बटाट्याची रस्सा भाजी खायला चविष्ट लागते. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण बटाट्याची भाजी आवडीने खातात.
बटाट्याची भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही सहज अगदी घरी ही रेसिपी बनवू शकता.
बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी बटाटे , टोमॅटो, आलं- लसूण पेस्ट, जिरे, हिंग, मसाला, हळद, धना पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, तेल हे साहित्य एकत्र करा.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये जिरे, हिंग, आलं - लसूण पेस्ट याची फोडणी द्या.
मिश्रणात टोमॅटो पेस्ट मिक्स करा आणि नंतर यात हळद, मसाला, आणि धना पावडर मिक्स करा.
मिश्रण तयार झाल्यानंतर यात उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी मिक्स करा आणि मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.
भाजीवर मीठ घालून झाकण ठेवा आणि त्यात पाणी घाला भाजी वाफेवर शिजवून घ्या.
अशाप्रकारे गरमा गरम बटाटा रस्सा भाजी सर्व्हसाठी तयार होईल.