Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: प्रेमासाठी धर्म बदलला, लग्नाला नकार दिल्यानं तरूण संतापला; तरुणीवर प्राणघातक हल्ला

Bandra Police Station: गंभीर जखमी प्रेयसीवर सायन रुग्णालयात (Sion Hospital) उपचार सुरु आहेत.

Priya More

Bandra News: गेल्या काही दिवसांपासून देशभरातून लव्ह जिहादची (Love Jihad) अनेक प्रकरणं समोर येत आहेत. अशामध्ये मुंबईतून देखील अशीच एक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी एका तरुणाने धर्मांतर केले. मात्र तरुणीने त्याच्यासोबत लग्न करायला नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सायन रुग्णालयात (Sion Hospital) उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये राहणारे प्रेयसी आणि प्रियकर वांद्रे बस स्टँड समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी बुधवारी रात्री आले होते. बँड स्टँड परिसरात फिरताना मौज मस्ती सुरू होती. मात्र अचानक या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. या भांडणावेळी संतापलेला प्रियकराने आपल्या जवळील धारदार शस्त्राने प्रेयसीवर हल्ला केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर दगडाने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात प्रेयसी अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात बसली होती. तिच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होत होता.

तरुणी हल्ला होत असताना आरडाओरडा केला. त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या पर्यटकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तरुणाला पकडून वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले. आकाश मुखर्जी असं या प्रियकराचे नाव असून त्याने लुबाना नावाच्या त्याच्या प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्लायत गंभीर जखमी झालेल्या लुबानाला वांद्रे पोलिसांनी भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी तिला सायन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लुबानाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. आकाश आणि लुबानाचे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही कल्याणमध्ये राहतात. आकाशने लुबानासाठी धर्म बदलला. पण तिला लग्नासाठी विचारणा केली असता तिने लग्नाला नकार दिला. यामुळेच संतप्त होत आकाशने हे पाऊल उचलले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वांद्रे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT