pune news  saam tv
मुंबई/पुणे

Pune : चांदणी चौकातील पूल कोणी, किती महिन्यांत बांधला होता?; स्वतः इंजिनीअर मराठेंनी सांगितली सर्व माहिती

चांदणी चौकातील पूल अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. चांदणी चौकातील पूल इंजिनीअर सतीश मराठे यांनी बांधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Chandni Chowk Bridge News : पुण्यातील (Pune) वाहतुकीला अडथळा असलेला चांदणी चौक हा पूल काल मध्यरात्री रात्री १ वाजता ब्लास्ट करुन पाडण्यात आला. या ब्लास्टमध्ये पूल (Bridge) पूर्णपणे पडला नसल्यामुळे ब्लास्ट केल्यानंतर पुलाचा इतर भाग हा १० जेसीबी मशिन्स लावून पाडण्यात आला. हाच चांदणी चौकातील पूल अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. चांदणी चौकातील पूल इंजिनीअर सतीश मराठे यांनी बांधला आहे.

चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर काही तासांनी पूलाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. या पूलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. याच चांदणी चौकातील पुलाबद्दल हा पूल ज्या इंजिनीअर सतीश मराठे यांनी बांधला. या पूलाबाबत आणखी महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडताना जवळपास ६०० किलो स्फोटके वापरण्यात आली. एवढ्यातही पूल पडला नाही. त्यामुळे पुन्हा सर्व ठिकाणी चर्चा सुरू झाली की, पूल एवढा मजबूत आहे तो बांधला कोणी ? तर हा पूल इंजिनीअर सतीश मराठे यांनी बांधला.

७६ वर्षीय सतीश मराठे यांनी तीस वर्षांपूर्वी अवघ्या साडे चार महिन्यात हा पूल बांधला. त्यांनाही या पूलाबद्दल उत्सुकता होती. मात्र, या पूल पाडण्याच्या कालावधीत कोणीही आलं नाही. पण आपण केलेल्या कामाचं समाधान असतं. त्यामुळे त्यांना समाधान आहे. सोशल मीडियावरील मेसेजची त्यांना माहिती नाही, असेही त्यांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT