Election SaamTV
मुंबई/पुणे

पुणे जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी १८ ऑगस्टला होणार मतदान

१८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची (Election) प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुकांच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची (Election) प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे. पुणे जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांसाठी निवडणुका होणार आहेत.

बारामती, चाकण, दौंड,राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर, मंचर, माळेगाव बुद्रुक या ठिकाणी निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, नगरपालिकांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता आयोगाने दिलेल्या प्रभाग रचना, आरक्षण सोडतीयच्या कार्यक्रमानुसार आरक्षणासहित अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. नगरपंचायतच्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रमही देण्यात आला होता. त्यानुसार अंतिम प्रभाग निहाय मतदारांच्या याद्या अधिप्रमाणित करुन त्या प्रसिद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार मतदान केंद्राची ९ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. (State Election Commission)

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानुसार जे जिल्हे पावसामुळे प्रभावित होणार नाहीत त्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम तात्काळ राबवावा व आवश्यक असल्यास परिस्थितीनुरुप त्यात बदल करावे असे आदेश दिले होते. त्यानुसार आता हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर आयोगाने १७ जिल्ह्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यानुसार आता १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका ४ नगरपंचायती सार्वत्रिक सदस्यपदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. २० तारखेला जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून २२ ते २८ जुलै दरम्यान नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहेत. या नामनिर्देशनपत्रांची छाननी २९ जुलैला होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

SCROLL FOR NEXT