मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सर्वत्र मतदानाची धावपळ पाहायला मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर देशासहित राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचदम्यान, निवडणूक आयोगाने राज्यातील काही दिग्गज उमेदवारांना नोटीस धाडल्या आहेत. त्यात पंकजा मुंडे, हेमंत गोडसे, भास्कर भगरे आणि बजरंग सोनवणे यांचा सामावेश आहे. त्यानंतर आता आयोगाने आचारसंहितेच्या भंगप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नोटीस पाठवल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मंगळवारी अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना नोटीस धाडली आहे. आचारसंहितेच्या भंगप्रकरणी नोटीस धाडली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात आणि इतर लोकसभा मतदारसंघातील प्रचारसभांमध्ये भाषण करताना प्रभाव टाकताना आमच्या उमेदवारांना मतदान केल्यास शासकीय निधी करू, असे विधान केल्याचा आयोगाचा आरोप आहे. या स्वरुपाच्या विधाने वारंवार करण्यात येत असल्याचा आरोप आयोगाने केला. त्यानंतर आयोगाने अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या भंगप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांना आयोगाची नोटीस बजावली आहे. या दोन्ही नेत्यांनी भाषण करताना आश्वासन न देण्याचे आदेश असताना उल्लंघन केल्याचा आरोप आहे. मतदारांना प्रलोभने दाखवली जात असल्याच्या तक्रारीनंतर नोटीस बजावण्यात आली आहे. विकासनिधीचं आश्वासन दिलं जात असल्याने नोटीस बजावण्यात आल्याचं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे या दोघांनी तपासणीसाठी सादर केलेल्या निवडणूक खर्चात तफावत आढळल्याचे समोर आले आहे. त्यानंतर 7 उमेदवारांनी निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केला आहे. दरम्यान, या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी 9 उमेदवारांना नोटीस बजावली आहे. तसेत त्यांना 48 तासांच्या आत खुलासा मागविला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.