Election 2022: प्रभाग पद्धत कशी असावी यावर आज निर्णय होण्याची शक्यता Saam Tv News
मुंबई/पुणे

Election 2022: प्रभाग पद्धत कशी असावी यावर आज निर्णय होण्याची शक्यता

महापालिकेत तसेच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

राज्यात पुढच्या वर्षी मुंबईसह पंधरा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी, तसेच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. याबाबत महाविकास आघाडीतील नेत्याची चर्चा झाली आहे. (Election 2022: The ward system is likely to be decided today ab95)

हे देखील पहा -

पंधरापैकी मुंबई महापालिकेत सध्याची एक प्रभाग पद्धत कायम राहणार तर उरलेल्या महापालिकेत दोन की चार प्रभाग पद्धती असावी यावर आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी अशी काही नेत्याची भूमिका आहे. नगरपंचायतीत एक सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

एक प्रभाग एक नगरसेवक यासंदर्भात निवडणूक आयोगाने अध्यादेश काढला होता. मात्र दोन सदस्य प्रभाग पद्धती असावी अशी मागणी पुणे राष्ट्रवादीची आहे, तर कोणत्याही प्रभाग पद्धतीत निवडणूक लढण्यास आपण तयार असल्याचे पुणे भाजपने म्हटलंय आहे. राज्यात ओबाीसी आरक्षणावरुन स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वादात ठरली होती. परंतु राज्य सरकार नवा अध्यादेश काढणार असल्याचं जाहिर केलं होतं. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या निवडणूका होणार आहेत. तसेच याबाबत महापालिकेत तसेच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT