Uddhav Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

आम्हाला सूरतला जबरदस्तीने उचलून नेलं; बंडखोर आमदारांचा उद्धव ठाकरेंना फोन: रिपोर्ट्स

सूरतमध्ये जबरदस्तीने उचलून नेले असल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी हॉटेलमधून फोन करून सांगितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याचा राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व नाराज आमदारांना घेऊन गुजरातच्या सुरत येथे गेले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचदरम्यान, सूरतच्या ली मेरडियन हॉटेलमध्ये गेलेल्या बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) फोनवरून संवाद साधला. त्यांना सूरतमध्ये जबरदस्तीने उचलून नेले असल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी हॉटेलमधून फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. शिंदे नाराजीनाट्यानंतर राज्यात सत्तापालट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याचदरम्यान, सध्याच्या राजकीय घडामोडीचा सर्वात मोठा खुलासा झाला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराज आमदारांना सुरतमधील ली मेरडियन या हॉटेलमध्ये घेऊन गेले. मात्र, या बंडखोरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंजवळ मोठा दावा केला आहे. ली मेरडियन हॉटेलमधील काही बंडखोर आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करून आम्हाला जबरदस्ती उचलून नेल्याचे सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या दाव्यानंतर राज्याच्या खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवले

शिवसेनेने (Shivsena) एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन हटवले आहे. शिवसेनेने आता अजय चौधरी यांना गटनेते पद दिले आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (maharashtra politics) आज (मंगळवार) सकाळपासून ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खंदे समर्थक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde latest updates) हे सेनेच्या (shivsena) सुमारे 17 आमदारांसह सूरतला (Eknath Shinde in Surat) गेल्याचे समजते. (Eknath Shinde Marathi news)

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर सावरेपर्यंत शिंदेंनी दूसरा धक्का दिल्याची चर्चा आहे. शिंदे हे गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील (Gujarat BJP chief C R Patil) यांच्याशी संपर्कात हाेते असेही समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

SCROLL FOR NEXT