Eknath Shinde, Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

शिंदे गट उध्दव ठाकरेंना आणखी मोठा धक्का देण्याच्या तयारीत; शिवसेना भवनचा ताबा घेणार?

शिवसेनेचे १४ खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडे केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता शिवसेनेचे १४ खासदारही शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे पुढचे लक्ष्य 'शिवसेना भवन' वर ताबा घेण्याचे असणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. (Eknath Shinde Latest News)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दमदार बंड उभारणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पुढचे लक्ष्य ‘शिवसेना भवन’ वर ताबा करण्याचे असेल, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. दादर येथे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. स्वतःचीच शिवसेना (ShivSena) मूळ शिवसेना असल्याचा शिंदे गटाने दावा केला आहे.

दोन तृतीयांश आमदारांना एकनाथ शिंदे गटात खेचण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. एकनाथ शिंदे यांनी आता गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर शिवसेना (ShivSena) पदाधिकाऱ्यांना गटात सामावून घेण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यातच विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी स्वतःची निवड करताना आता शिवसेनेच्या राज्य व राष्ट्रीय कार्यकारिणीत देखील मोठी फूट पाडण्याची यशस्वी रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. तर भविष्यात शिवसेनेचे मुख्यालय 'शिवसेना भवन' यावरही शिंदे गट दावा करणार असल्याने राज्यात येणाऱ्या काळात मोठा संघर्ष पहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.(Eknath Shinde Latest News)

केंद्रीय यंत्रणांचा वापर: संजय राऊत

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आता शिवसेनेच्या एकूण खासदारांपैकी १४ खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान हे चौदा खासदार शिंदे गटाच्या बैठकीसाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते अशी माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया दिली.

अचानक काही खासदारांच्या घरावर पोलिसांचा चौकी पहारा लागला आहे. पोलीस बळाचा वापर होत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर सध्या सुरू आहे. पण असुदे कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला बाळासाहेबांची शिवसेना तयार आहे, अशी प्रतिक्रीया खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं? आदिती तटकरेंनी सांगितली सगळी कारणं

Maharashtra News Live Update: नालासोपाऱ्यात परदेशी महिलेवर हल्ला

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

SCROLL FOR NEXT