Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे गटातील कोणत्या आमदारांना मंत्रीपद मिळणार? यादी आली समोर

राज्यात काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडे केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. विधान परिषद निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सेनेच्या आमदारांनी बंड केले. शिवसेनेच्या ४० पेक्षा अधिक आमदारांनी बंड केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनीच बंड केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे गटातील आमदारांना उपमुख्यमंत्री पदासह अनेक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. बंडखोर आमदार भाजपसोबत जात सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे गटातील मंत्री पदांची यादी साम टीव्हीला मिळाली आहे.

कोणाला मिळणार मंत्रीपद?

महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) मध्ये मंत्रीपद असणाऱ्या नेत्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे. तर दादा भुसे यांना कॅबिनेट मिळणार आहे. संदीपान भुमरे यांनाही मंत्रीपद मिळणार आहे. गलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, राजेंद्र यड्रावकर यांच्यासह संजय राठोड यांचेही पुर्नवसन होणार असल्याचे बोलले जात आहे.

कारवाईविरोधात एकनाथ शिंदे गट सुप्रीम कोर्टात

राज्यात गेल्या काही दिवसापासून राजकीय संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतील (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड पुकारले आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेने १५ आमदारांविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या १५ आमदारांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी होणार आहे.

सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज जस्टीस सूर्यकांत आणि जस्टीस पारडीवाला यांच्या बेंच समोर सुनावणी होणार आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत उपसभापती, राज्य विधानसभेचे सचिव, महाराष्ट्र सरकार, शिवसेनेचे उपनेते अजय चौधरी, शिवसेनेचे सुनील प्रभू आदींचा समावेश आहे. तसेच बंडखोरी केलेल्या आमदारांच्याकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडणार आहेत. तसेच शिवसनेकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT