Eknath Shinde News, Political Crisis in Maharashtra saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटासोबत सध्या किती आमदार? वाचा सविस्तर

राज्यात काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेतील (ShivSena) आमदारांच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केले आहे. शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच आहे. काल मंत्री उदय सामंतही एकनाथ शिंदे गटात गेले. शिंदे गटात सध्या ४७ आमदार गेले असल्याचे बोलले जात आहे. यात शिवसेनेचे (ShivSena) ३८ आणि अपक्ष ९ आमदार आहेत. यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अडचणीत आले असल्याचे बोलले जात आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

एकनाथ शिंदे गटातील आमदारांना उपमुख्यमंत्री पदासह अनेक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. बंडखोर आमदार भाजपसोबत जात सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेतील आमदार

एकनाथ शिंदे, अनिल बाबर, शंभूराजे देसाई, महेश शिंदे, शहाजी पाटील, महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, प्रकाश अबिटकर, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार नबी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, सौ. लता सोनावणे, प्रताप सरनाईक, सौ. यामिनी जाधव, योगेश कदम, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत शिवसेनेच्या एकुण ३८ आमदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

अपक्ष आमदार कोण आहेत?

बच्चू कडू, राजकुमार पटेल, राजेंद्र यड्रावकर, चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, सौ.मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, सौ. गीता जैन अपक्ष ९ आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला ४७ आमदारांनी पाठिंबा दिल्याने आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ८ कॅबिनेट मंत्र्यांचा यात समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT