former mp shivajirav adhalrao patil Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई

शिवसेनेने पक्षाविरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता शिवसेनेने पक्षाविरोधी काम केलेल्या नेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. काल शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई केल्याचे समोर आले होते. आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर केल्याचे सांगण्यात येत आहे. (Eknath SHinde Latest News)

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सामील झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांचावर मोठी कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेविरोधातील (ShivSena) बंडखोरी भोवली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. "तुम्ही पक्षविरोधी कारवाया करत आहात आणि स्वेच्छेने शिवसेनेचे सदस्यत्वही सोडले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील 'शिवसेना नेते' पदावरून दूर करत आहे, असे पत्र काढून ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर कारवाई केली आहे.

शिवसेना नेते हे शिवसेना पक्ष संघटनेतील अत्यंत मानाचे पद मानले जाते. पक्षातील जो तो व्यक्ती नेते म्हणून घेवू लागला, त्यामुळे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेत नेते पद निर्माण केले. यात १२ व्यक्तींना स्थान होते. मनोहर जोशी, सुधीर जोशी, अॅड. लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, संजय राऊत, रामदास कदम, अनंत गीते, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसुळ, चंद्रकांत खैरे अशा नेत्यांचा समावेश होता. आता यातील सुधीर जोशी यांचे निधन झाले असून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.(Eknath SHinde Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

राज्य सरकारनं ग्रामसेवकांसंदर्भात घेतला मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदेंचा चाकण पाहणी दौरा सुरू; पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पाहणीपासून दौऱ्याला सुरुवात

SCROLL FOR NEXT