Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबई केंद्रशासीत करण्यासाठी शिवसेना संपवण्याचा डाव; संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेत अभी फूट पडल्याचे दिसत आहे, त्यामुळे आता मुंबईसह राज्यभरात मेळावे घेण्यात येत आहेत. आज दहीसर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांवर टीका केली.

'मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी शिवसेना संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. आम्ही हा प्रयत्न हाणून पाडत आहे, त्यामुळेच शिवसेनेला संपण्याचा कट शिजत असल्याचेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

शिवसेनेला एकच बाप -

तसंच आता त्या हॉटेलमध्ये जे ४० लोकं आहेत ती जीवंत प्रेत, मुडदे आहेत. महाराष्ट्रात येताना त्यांच्या फक्त बॉडी येणार, त्यांच्यातील आत्मा मेलेला असणार, ते सध्या ती लटपटतायत. त्यांना माहिती आहे इकडे आग पेटली आहे. अशा कठोर शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीका केली. दरम्यान, ते हॉटेल नव्हे तर बिगबॉसचे घर वाटतं आहे. बसतायत पितातायत आणि खातायत असा टोलाही त्यांनी आमदारांना लगावला.

ते पुढी म्हणाले, 'शिवसेनेला (Shivsena) एकच बाप आहे आणि तो बाप कोणाला चोरता येणार नाही. आमची बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि तेच आमचे बाप आहेत. मात्र, बंडखोरांचा एक बाप नाही, दिल्लीत ४, गुजरातमध्ये ३, गुवाहाटीत २ आणि मुंबईत अजून काही बाप आहेत अशा शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीकास्त्र डागलं.

आम्हाला बघून मोदी शहा रस्ता बदलतात -

यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धर्म की अधर्मवीर असं म्हणत ते अधर्मवीर आहेत अशी टीका केली. शिवाय 'गद्दारांना क्षमा नाही' हे आनंद दिघेंचे स्टेटमेंट मी घेतलं असल्याचा दावा केला. तसंच हे सर्व बंडखोर शिवसेनेच्या पैशांवर मोठे झाले. शिवसेना या चार अक्षराने आम्हाला राष्ट्रीय नेता केलं. आम्हाला बघून मोदी शहा रस्ता बदलतात. लोक म्हणतात याच्या नादाला लागू नका, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. वेळ पडली तर झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल असंही ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Maharashtra Fort : ५,१४१ फूट उंचीवर दिमाखात उभा आहे किल्ला, २-३ तासांचा थरार ट्रेक करून गाठता येतो माथा

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

SCROLL FOR NEXT