Sanjay Rathod Saam Tv
मुंबई/पुणे

संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्याने एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढली; चर्चांना उधाण

मंत्रिमंडळात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सत्तास्थापनेच्या एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला. शिंदे गटातील ९ तर भाजमधील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणी काल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे.

सुरूवातील मंत्रिमंडळाच्या यादीत संजय राठोड यांचे नाव नसल्याची चर्चा होती, पण नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाले असल्याची चर्चा सुरू आहे.

एका मुलीच्या आत्महत्ये प्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव पुढे आल्यानंतर राठोड यांना मंत्रीपद नाकारण्यात आले होते. संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणत मंत्रिमंडळ विस्तार यादीत नाव टाकून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपल्याला या प्रकरणी चौकशीत क्लिन चिट मिळाल्याचा दावा करत शिंदे यांच्यावर राठोड यांनी दबाव आणल्याची माहिती सूत्रांनी दिली. संजय राठोड यांना मंत्रिपद मिळताच भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी ही राठोड यांनी मंत्रिपद देणे चुकीचे असल्याची भूमिका मांडली होती. आपल्या सोबतच्या आमदारांचे दबावतंत्र वाढत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिपदासाठी अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्रीच घेतली होती भेट

मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समजूत काढली असल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी मंत्रिपदासाठी दावा केला होता, पण काल अनेकांचा पत्ता कट झाला त्यामुळे आता नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार ठरला तेव्हा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोली, नांदेड दौऱ्यावर गेले होते. ते सोमवारी दौरा करुन रात्री मुंबईत दाखल झाले. यानंतर मध्यरात्री मुंबईत नंदनवन बंगल्यात खलबते सुरू झाली.

काही दिवसापूर्वी टीईटी घोटाळा समोर आला होता, या घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे असल्याची बातमी आली होती, त्यामुळे सत्तार यांचा मंत्रिपदावरुन पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. (Eknath Shinde Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत खळबळ! हायप्रोफाईल एरियात मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

IND T20 WC 2026: शनिवारी टी-२० वर्ल्डकपचा थरार! टीम इंडिया कोणासोबत करणार दोन हात, १५ शिलेदार कोणते, A टू Z माहिती एका क्लिकवर

Mumbai News: IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

Video Viral: रिलसाठी काहीपण!!! धावत्या लोकलमध्ये लटकत तरूणीचा स्टंट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT