Eknath Shinde Latest News, Shivsena News
Eknath Shinde Latest News, Shivsena News Saam TV
मुंबई/पुणे

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले भाजपसोबत अद्यापही मंत्रिपदाबाबत...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बहुमत चाचणीच्या अगोदरच शिवसेना (Shivsena) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आघाडी सरकार अडचणीत आले होते. त्यामुळे आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा सरकार स्थापन स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाल्याची आणि संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली होती, या संदर्भात आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे.(Eknath Shinde Latest Marathi News)

आज सकाळी एकनाथ शिंदे गटातील कुणाला मंत्रीपद मिळणार या संदर्भात एक यादी व्हायरल झाली होती. मंत्रिमंडळाबाबत अजुनही आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही, अस एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) आज सांगितले आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी य संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. 'भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका.' वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस',अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

शिंदे गटातील नेत्यांना मिळणार मंत्रिपदी बढती

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले होते. या बंडात महाविकास आघाडीमध्ये मंत्री असणारे नेत्यांनीही बंड केले होते, यात शिवसेना (ShivSena) नेते शंभूराजे देसाई यांनीही बंड केले होते. आणि अपक्ष असणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीही बंड केले होते. या दोन्ही मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बढती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसात शपथविधी होणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मोठी बातमी! जय पवार मनोज जरांगेंच्या भेटीला

Maharashtra Lok Sabha 2024: राज्यात महाविकास आघाडीला किती जागांवर यश मिळणार? विजय वडेट्टीवारांनी थेट आकडाच सांगितला

Hingoli News : वाळू माफियांची दादागिरी; मध्यरात्री तलाठ्यांच्या घरावर हल्ला, दरवाजा न तुटल्याने दोन तलठ्यांचे प्राण वाचले

Vishal Patil: सांगलीत वाऱ्याचं वादळ झालंय; माझा विजय निश्चित... विशाल पाटलांनी व्यक्त केला विश्वास; संजय राऊतांना फटकारले

Self Development Tips: स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःला लावा या '५' सवयी

SCROLL FOR NEXT