Eknath Shinde Latest News Saam TV
मुंबई/पुणे

मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कार्टात याचिका केली दाखल

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेतील ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आता कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटातील १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे, या प्रकरणी आता एकनाथ शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आमदारांचे निलंबन आणि गटनेता यांच्यावरील कारवाई विरोधात आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. उद्या या संदर्भात सुनावणी होणार असल्याचे बोलले जात आहे, यामुळे आता शिंदे गट विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा सामना कोर्टात रंगणार आहे.

उद्या सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टात एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. जस्टीस सूर्यकांत आणि जस्टीस पारडीवाला यांच्या बेंच समोर सुनावणी होणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष यांनी शिंदे गटाच्या १६ आमदारांना केलेल्या निलंबनाच्या आणि शिवसेनेनं नियुक्त केलेल्या गटनेत्या विरोधात याचिका दाखल केली आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई केंद्रशासीत करण्यासाठी शिवसेना संपवण्याचा डाव

शिवसेनेच्या (Shivsena) ४० आमदारांनी बंड केल्यानंतर आता शिवसेनेत अभी फूट पडल्याचे दिसत आहे, त्यामुळे आता मुंबईसह राज्यभरात मेळावे घेण्यात येत आहेत. आज दहीसर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, या मेळाव्यात शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांवर टीका केली.

'मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी शिवसेना संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. महाराष्ट्राचे चार तुकडे करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. आम्ही हा प्रयत्न हाणून पाडत आहे, त्यामुळेच शिवसेनेला संपण्याचा कट शिजत असल्याचेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

शिवसेनेला एकच बाप -

तसंच आता त्या हॉटेलमध्ये जे ४० लोकं आहेत ती जीवंत प्रेत, मुडदे आहेत. महाराष्ट्रात येताना त्यांच्या फक्त बॉडी येणार, त्यांच्यातील आत्मा मेलेला असणार, ते सध्या ती लटपटतायत. त्यांना माहिती आहे इकडे आग पेटली आहे. अशा कठोर शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीका केली. दरम्यान, ते हॉटेल नव्हे तर बिगबॉसचे घर वाटतं आहे. बसतायत पितातायत आणि खातायत असा टोलाही त्यांनी आमदारांना लगावला.

ते पुढी म्हणाले, 'शिवसेनेला (Shivsena) एकच बाप आहे आणि तो बाप कोणाला चोरता येणार नाही. आमची बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि तेच आमचे बाप आहेत. मात्र, बंडखोरांचा एक बाप नाही, दिल्लीत ४, गुजरातमध्ये ३, गुवाहाटीत २ आणि मुंबईत अजून काही बाप आहेत अशा शब्दात त्यांनी बंडखोरांवर टीकास्त्र डागलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

Washim Bribe Case : सरपंच महिला ACB च्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडली

SCROLL FOR NEXT