Eknath Shinde yandex
मुंबई/पुणे

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Eknath Shinde news : विधानसभा निवडणुकीच्य मतमोजणी कलावर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरही भाष्य केलं.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल महायुतीच्या बाजूने लागले आहेत. महायुती सहज बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. महायुतीच्या नेत्यांकडून विजयाचा जल्लोष सुरु केला आहे. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

महायुतीच्या विजयी वाटचालीवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, 'आम्ही जी कामे केली, त्याला लोकांनी प्राथमिकता दिली. आशीर्वाद दिला. कार्यकर्त्यांचे आभार. त्यांनी मेहनत घेतली. अडीच वर्षांत डबल इंजिनचं सरकार चाललं आहे. नरेंद्र मोदींनी खूप पाठिंबा दिला. अमित शहांनी केंद्रातील नेत्यांनी महाराष्ट्राला प्राधान्य दिलं. आमच्या २०० हून जास्त जागा येतील, असं मी म्हणालो होतो. ते खरं ठरलं आहे'.

'अभिनंदनाचे फोन आले.आम्ही एक टीम म्हणून काम केलं. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आम्ही एकत्रित काम केलं. सर्वांनी निश्चित केलं की, सर्वांना न्याय देणारं सरकार आहे. लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी या दोन योजना लोकप्रिय ठरल्या. त्यात लाडके भाऊ, ज्येष्ठ नागरिक त्यात सगळं आलं. लाडक्या भावाला बहिणींनी खूप सहकार्य केलं. आशीर्वाद दिले, असे शिंदे पुढे म्हणाले.

मुख्यमंत्रिपदावर बोलताना शिंदे म्हणाले, ' सगळे नंबर आल्यानंतर तिन्ही पक्ष एकत्रित बसू. त्याबाबतचा जो निर्णय आहे, तो समन्वयानं निर्णय होईल. जास्त जागा म्हणजे मुख्यमंत्री असं, मी म्हणालो नाही. आम्ही तिन्ही पक्ष बसून निर्णय घेऊ. समन्वयाने निर्णय होईल. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. ज्यांनी बाप काढला, त्यांना जनतेने बाप दाखवला'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT