Maharashtra Cabinet Expansion  SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट; दुसऱ्या टप्प्यात इतक्या मंत्र्यांचा शपथविधी होणार!

Shinde Fadnavis Government Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रुपाली बडवे, साम टीव्ही

Shinde Fadnavis Government Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.  (Latest Marathi News)

त्यामुळे आता नवीन मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाचा विस्तार झालाच तर तो छोटेखानी असेल. यामध्ये जास्तीत जास्त १० जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल.

सध्याच्या घडीला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  गटासह आणि भाजपचे २० मंत्री आहेत. यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. विधानसभेच्या एकूण सदस्यांची संख्या लक्षात घेता आणखी २३ जणांना मंत्रिपद दिले जावू शकते. (Maharashtra Political News)

तीन मंत्रिपदे रिक्त ठेवून विस्तारात २० जणांना संधी दिली जाईल असा तर्क होता. मात्र, आता अशी माहिती समोर येत आहे, की भाजपच्या सहा व शिंदे गटाच्या चौघांना सामावून घेतले जाईल.

भाजपचे चार जण कॅबिनेट मंत्री (Cabinet Expansion) तर दोन जण हे राज्यमंत्री असतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजप श्रेष्ठींनी हिरवा कंदील दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कालच्या भेटीत या दोघांनी याबाबतही चर्चा केली.

दोन ते तीन मंत्रिपदे रिक्त ठेवून २० मंत्रिपदे भरावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र,अद्याप मोठ्या विस्ताराला पक्षश्रेष्ठींनी अनुमती दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्याची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT